सांगली : इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने इस्लामपूर शहरासह जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीची भीषणता लक्षात येताच तात्काळ गरज असलेल्या सर्व उपाययोजना केल्या. यामुळे इस्लामपूरात कोरोनामुळे सुरुवातीला जितके रुग्ण आढळून आले आता तसे रुग्ण वाढणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते फेसबुक लाईव्हद्वारे सांगलीतील तसेच राज्यातील जनतेसह संवाद साधत होते.


मागील आठवड्यात सांगलीच्या इस्लामपूरात कोरोनाचे 25 रुग्ण आढळले. ही बातमी कळाताच मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ प्रशासनाला योग्य निर्देश देत परिस्थिती आटोक्यात आणली. आजच्या लाईव्हमध्ये माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, सांगली जिल्हा प्रशासन सर्व गोष्टींची काळजी घेत आहे. सर्वत्र निर्णयांचे पालन केले जात आहे. सांगलीच्या मिरज येथे विशेष कोरोना रुग्णालय स्थापन केले गेले आहे. ज्यात जास्तीच्या व्हेंटिलेटरची सुविधा केली गेली आहे. मॉनिटर, मास्क, पीपीईच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. गरज पडली तर खासगी यंत्रणांची मदत घेतली जाईल. मात्र, नागरिकांना कोणती अडचण होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.

कोरोनाशी लढण्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे


कोरोना जात, धर्म पाहत नाही, नियम सर्वांना सारखेच


सांगलीतील सर्व व्यवस्था आता हळूहळू पूर्ववत होत आहेत. सांगलीतील प्रायव्हेट क्लिनिक आता सुरू झाले आहेत, पेट्रोल-डिझेलाचाही प्रश्न आता सुटला आहे. भाजीपाल्याचीही योग्यप्रकारे खरेदी विक्री होत आहे. किराणा मालाचा तुटवडा होत असल्याचे कळते आहे त्याबाबतही आम्ही योग्य नियोजन करत आहोत. लवकरच हाही प्रश्न सोडवला जाईल असे ते म्हणाले. कोरोना कोणतीही जात, धर्म पाहत नाही. सर्वांना नियम सारखेच आहेत. आपल्याला आपले राज्य, आपला जिल्हा वाचवायचा असेल तर कृपा करून सर्वांनीच नियमांचे पालन करा. सोशल डिस्टन्सींगचे पालन करा असे पाटील म्हणाले.


Nashik Vegetable Basket | नाशिकमध्ये 5 ते ८ किलोच्या भाजीपाल्याचं बास्केट, सह्याद्री फार्म कंपनीचा उपक्रम