LIVE UPDATES | एटापल्ली तालुक्यातील हेलडलमी जंगलात पोलीस, नक्षल चकमक, एक नक्षली ठार,

मुंबई : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराने वाढली आहे. देशात गेल्या 24तासांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 903 ने वाढली तर मृतांचा आकडा 379 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 25 हजार 544 झाला आहे.त्यापैकी एकूण 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 60.72 टक्के आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 2 लाख 27 हजार 439 इतके आहेत. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे. 20 जुलै पर्यंत देशात 92  लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत.कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jul 2020 09:18 PM
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लालबागपाठोपाठ आता गिरणगावातला चिंचपोकळीचा चिंतामणी मूर्ती घडवणार नसून पारंपारिक चांदीच्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करणार असल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
मराठा आरक्षणावरील सुनावणी 7 जुलैला सुप्रीम कोर्टात होणार आहे. ही सुनावणी ऑनलाईन होणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 76 प्रतिबंधीत क्षेत्र तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी 34 प्रतिबंधीत क्षेत्र एकट्या मलकापूर उपविभागात आहेत. मात्र, तरीही मलकापूर उपविभागात कोविड रूग्णांची संख्या वाढत आहे. मलकापूर उपविभागात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने 15 जुलैपर्यंत बंद असणार आहेत.लॉकडाऊनमध्ये मलकापूर शहर आणि उपविभागात कोणत्याही व्यक्तीला मुक्त संचार करण्यास मनाई आहे. मलकापूर उपविभागाच्या सर्व सीमा, सार्वजनिक वाहतूक सेवा, सर्व खाजगी वाहने, दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहनांना फिरण्यास मनाई आहे. मात्र, मलकापूर शहरात नागरिक बिनधास्त पणे फिरतांना दिसत आहेत.
शेतकरी कर्ज माफी योजनेचे २ हजार ३३४ कोटी रूपये आज सरकारकडून वितरीत करण्यात आले आहेत. गेल्या चार दिवसात सुमारे साडे तीन हजार कोटी शेतकरी कर्ज माफीसाठी दिले. बॅका सरकारला थकबाकीदार मानायला तयार नव्हत्या. साडे अकरा लाख शेतकर्यांचे पीक कर्ज रखडले होते
जेईई मुख्य परिक्षा 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान आणि नीट परिक्षा आता 13 सप्टेंबरला होणार. वाढत्या कोरोना संसर्गामुळे निर्णय.
सोलापुरातील ग्रामीण भागात तब्बल 61 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर पाच जणांचा मृत्यू. ग्रामीण भागात एका दिवसात झालेली आतापर्यंतची सर्वाधिक वाढ.
गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यातील हेडरी पोलिस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या हेलडलमी जंगल परिसरात चकमक झाली. नक्षल्याचे शिबीर उध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त. या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा करण्यात आल्याची माहिती. सी - 60 पथकाचे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. पोलीस जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक नक्षली ठार. पोलीस जवानांचा वाढता दबाव पाहून नक्षली जंगलात झाले पसार. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील जाणवली नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कणकवली आचरा रस्ता पाण्याखाली गेला आहे. तर कणकवली शहरातील गणपती साना परिसरात पाणी साचलं आहे. कणकवली शहरातून वाहणारी जाणवली नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने दोन्ही ठिकाणी पाणी साचलं आहे. आज जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असून जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 1335 मी. मी. पाऊस झाला असून गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस मालवण तालुक्यात झाला आहे.
खोकरमोहा येथील रहीवाशी ज्ञानेश्वर उत्तम देशमुख यांना एक मुलगी अमृता 12 वर्षांची आणि एक मुलगा आठ वर्षांचा आहे. ही दोन्ही मुलं परिसरातील इतर मुलांसोबत खेळत असतं. हे वडिलांनी पाहिले आणि मुलीला तू मुलांसोबत का खेळतेस? असा प्रश्न विचारत तिला शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय तिला भिंतीच्या कडेला उभे करून उपाशी ठेवले. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार केला गेला मुलगी आणि तिची आई उपाशी पोटीच झोपली. हा त्रास सहन न झाल्याने मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. त्यानंतर मुलीच्या आईने माझ्या मुलीच्या आत्महत्येस माझे पतीच जबाबदार असल्याची फिर्याद पोलिसांत नोंदवली आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून शिरुर पोलिसांनी मुलीचे वडिल ज्ञानेश्वर देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जुलै, ऑगस्टच्या पावसात मुंबई पाण्याने तुंबणार असून मुंबईतल्या नाल्यांची सफाई झालीच नाही, असा आरोप विरोधीपक्षनेता रवी राजा यांनी महापालिकेवर केला आहे. दोन दिवसांपुर्वी नाल्यात उतरून रियालिटी चेक केला. यात पाच ते सहा फुट गाळ अजूनही असल्याचं समोर आलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही महापालिकेने गाळ काढून टाका. यासोबतच गाळ पूर्णपणे काढला असल्याचं सांगून ज्या कंत्राटदाराला क्लीन चीट दिली त्याला लवकरात लवकर ब्लँकलिस्ट करा. या प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे. आशा लोकांवर गुन्हे दाखल व्हायला हवेत. मी अँटी करप्शनला सोमवारी पत्र लिहून चौकशीची मागणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा शहरात सकाळी 11 वाजताच्या सुमारास काळा पुलावर कार आणि रिक्षामध्ये विचित्र अपघात झाला. यावेळी दोन्ही वाहने काळा पुलावरून थेट ओहळाच्या पात्रात कोसळली. यामध्ये रिक्षा चालक जखमी झाला असून उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुलडाण्याच्या मलकापूर इथं कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मलकपूरच्या बीपीएड कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या खदानीत सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. यात कांचन बामंदे आणि शुभांगी दुतोंडे ही मृत झालेल्या मुलींची नावं आहेत. तीन मुली कपडे धुण्यासाठी या खदानीवर गेल्या होत्या कांचन बामंदेचा( वय 14) कपडे धुत असताना पाय घसरला ती पाण्यात बुडत असतांना तिला वाचवण्यासाठी शुभांगी दुतोंडे (वय 10) ही तिला वाचण्यासाठी गेली असता ती पण बुड लागली या दोघींना वाचवण्यासाठी नेहा वानखेडे ही समोर आली असताना तिचा पण पाय घसरला तेवढ्यात परिसरातील नागरिकांनी तिला वाचवण्यात यश आल मात्र, दोघींचा पाण्यात दुर्दैवाने बुडून मृत्यू झाला.
महाराष्ट्र एसटी वर्कर्स अर्थात इंटक तर्फे राज्यात विविध ठिकाणी आज निदर्शनं आंदोलनं करण्यात आलीत .धुळ्यात इंटक तर्फे काळ्या फिती लावून मूक निदर्शनं करण्यात आलीत . शासनानं एसटी महामंडळास आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं , एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्यात यावेत ,एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 50 टक्के पगार त्वरित मिळावा , एसटीला इंधन कर , टोल टॅक्स माफ करावा, एसटीला मोटार वाहन कर माफ करावा . एसटीला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मालमत्ता कर माफ करावा . परिवर्तन बस खरेदीसाठी शासनानं आर्थिक सहाय्य करावं . देशातील इतर राज्यांप्रमाणे एसटीला प्रवाशी कर 17.5 टक्क्यांऐवजी 7 टक्के करावा. राज्य परिवहन महामंडळाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूनं एक हजार कोटी रुपये अनुदान देण्यात यावं. या मुख्य मागण्यांसह इतर 23 मागण्यांसाठी इंटक तर्फे काळ्या फिती लावून शुक्रवारी सकाळी सुरुवातीला विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर मूक निदर्शनं करण्यात आलीत नंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शनं करण्यात आली आहेत.
कोरोनाच्या लढ्यात आशा सेविकांच मोठं योगदान आहे,आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून आशा सेविका सर्व्हेक्षण आणि आरोग्य तपासणी मोहिमेत सहभागी झाल्या असल्याच पाहायला मिळत आहे,मात्र एवढे काम करूनही आशा सेविकांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने त्यांच्या या बाबत काही मागण्या आहेत शासनाने नुकतीच काही मदत जाहीर केलेली असली तरी ही आशा सेविकांच्या काही मागण्या कायम आहेत या मध्ये मागील थकबाकी त्वरित मिळावी, योजना कर्मचार्यांचा दर्जा मिळावा,त्यात कायम करण्यात यावे,आरोग्य कर्मचाऱ्या प्रमाणे 300 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळावा या स ह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव वर्कर युनियनचे तर्फे आज जळगाव मनपा समोर आशा सेविकांनी प्रातिनिधिक स्वरूपात एकत्र येत निदर्शने केल्याच पाहायला मिळालं आहे.
जालना : शहरात रविवारी रात्री 12 वाजल्यापासून पुढील 10 दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यलयात नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी यासंर्भात माहिती दिली. केवळ वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
पुत्र प्राप्तीबाबद वादग्रस्त वक्तव्य : इंदोरीकर महाराज यांना 7 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश, आपले म्हणणे मांडण्यासाठी उपस्थित राहण्याचे संगमनेर न्यायालयाचे आदेश
इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरण, संगमनेर न्यायालयात आजच्या कामकाजाला सुरुवात, इंदोरीकर महाराज यांना कोर्टात हजर राहण्याबाबत कोर्ट काय ऑर्डर काढते याकडे लक्ष
सोलापूर :

असंघटित कामगारांच्या मागण्यांसाठी शेकडो कामगारांना घेऊन आंदोलन,

कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली सिटू संघटनेचे आंदोलन,

विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई सुरू
बुलडाणा : बुलडाण्याच्या मलकापूर इथं कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा बुडून मृत्यू,

मलकपूरच्या बीपीएड कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या खदानीत बुडून या मुलींचा मृत्यू झालाय,

कांचन बामंदे , शुभांगी दुतोंडे मृतक मुलींची नावे,
औरंगाबाद : वाळूज परिसरातील बजाज कंपनीसमोर आंदोलन, माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचं आंदोलन, बजाज कंपनीमुळे वाळूज परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचा आरोप, हर्षवर्धन जाधव यांनी लावलं कंपनीचे गेट
पुण्यात रात्रभरात 132 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 25076 तर आत्तापर्यंत 806 कोरोना बाधितांचा मृत्यू,
एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 15364 वर
भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराने वाढली आहे. देशात गेल्या 24तासांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 903 ने वाढली तर मृतांचा आकडा 379 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 25 हजार 544 झाला आहे.

त्यापैकी एकूण 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 60.72 टक्के आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 2 लाख 27 हजार 439 इतके आहेत. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे. 20 जुलै पर्यंत देशात 92 लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत.
आज भाजपची कार्यकारणी जाहीर होण्याची शक्यता,

भाजप प्रदेशाध्यक्ष पदानंतर संघटनेत सरचिटणीस (महामंत्री) पद प्रतिष्ठेचं ,

सर चिटणीस यांना मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात अशी विभागवार दिली जाते जबाबदारी,

तर प्रत्येक जिल्ह्यात उपाध्यक्ष आणि चिटणीस यांची होते नेमणूक,

तसेच महिला मोर्चा अध्यक्षा आणि युवा मोर्चा अध्यक्ष पदही महत्त्वाची,

या कार्यकारिणीत चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, सुजित सिंघ ठाकूर, श्रीकांत भारतीय यांची सरचिटणीस पदी वर्णी लागण्याची शक्यता,

मात्र पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे यांचा राज्य कार्यकरिणीत विचार नाही,

विनोद तावडे यांना केंद्रीय पक्ष संघटनेत स्थान मिळण्याची शक्यता
हवामान खात्याच्या वतीने 2 आणि 3 जुलैला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरीप सुरु झाली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार येत्या 24 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून देखील सर्वसामान्य नागरिकांना ट्विट करून घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तळकोकणात रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे.पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठलं आहे. रात्रीपासून सुरु असलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, मालवण, दोडामार्ग, सावंतवाडीत मुसळधार पाऊस सुरु आहे.
आसाम मधील गौहाती येथे सैन्यात सेवा बजावणारे सुनील सदाशिव खिलारे (34) यांचा सेवा बजावताना शहीद झाले. सुनील खिलारे हे बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळी गावचे असून 2007 मध्ये ते सैन्यात दाखल झाले होते.सुनील खिलारे यांचे वडीलही सैन्यात होते.त्यांचा भाऊही सैन्यात सेवा बजावत आहे.घरात सैनिकी सेवेची परंपरा असल्याने सुनील खिलारे देखील देशसेवेसाठी सैन्यात दाखल झाले होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,आई,वडील,भाऊ असा परिवार आहे.गौहाती येथून त्यांचा मृतदेह मंगसुळी येथे आणण्यात येणार आहे.


कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण,

या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आज महापालिका मुख्यालय बंद,

महापालिकेचे मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी दिवसभर बंद
रत्नागिरी जिल्ह्याच्या एसपींना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या सीईओंना देखील कोरोनाची लागण झाली आहे. काल संध्याकाळी याबाबतचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता सीईओंना होम क्वारंटाईन करून ठेवण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब देखील आता तपासाणीकरता घेतले जाणार आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 683वर पोहोचाला आहे. तर, जिल्हाधिकारी .यांचे स्वॅब देखील काल तपासणीकरता घेतले होते ते निगेटीव्ह आल्याची माहिती आता समोर येत आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता 8 जुलैपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, जिल्ह्यातील दोन बडे अधिकारी कोरोनाबाधित आढळून आल्यानं आता आरोग्य यंत्रणा देखील आणखी सतर्क झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 हजार 967 नमुने तपासणीकरता घेण्यात आले असून 9 हजार 808 अहवाल प्राप्त झाले आहेत. तर, 159 अहवाल प्रलंबित आहेत.
मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना स्वादूपिंडाच्या कर्करोगाने आजारी होते. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

डॉ. अजय देशमुख यांनी २४ जानेवारी २०१९ रोजी मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिव पदाचा पदभार स्वीकारला होता. या अगोदर डॉ. देशमुख हे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे कुलसचिव पदावर कार्यरत होते. त्यापूर्वी ते संचालक महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ या पदावर कार्यरत होते. डॉ. अजय देशमुख यांनी त्यांचे पदव्युत्तर शिक्षण एम. ए. इंग्रजी या विषयात पूर्ण केले होते. तर त्यांनी पीएचडीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले होते. त्यांच्या अकाली निधनाने उच्च शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. विद्यापीठ प्रशासन, सिनेट सदस्य आणि विविध विद्यार्थी संघटनांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईतील सांताक्रुझ स्मशानभूमीत त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.
बॉलिवूड सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार एक दिवस नाशिक मुक्कामी होते, खाजगी दौऱ्यानिमित्ताने नाशिकला अक्षय आल्यानं शहरात कुतूहलाचा विषय झालाय, अक्षयच्या दौऱ्या बाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, अक्षयच्या येण्याचं कारण स्पष्ट झालं नसलं तरी काही वैद्यकीय कारणां निमित्ताने आल्याची माहिती मिळत आहे, नाशिकचे हवामान चांगले असल्यानं पुन्हा नाशिकला येण्याचा मानस व्यक्त केला असून मार्शल आर्ट ची अकॅडमी नशिकमध्ये भविष्यात सुरू करणार अशी चर्चा आहे,
राज्याच्या मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करावी लागेल असे वक्तव्य केलं आहे, यावरून बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला, र.ग.कर्णीक प्रणीत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना वेतन कपात कदापि सहन करणार नाही.करोनाशी अहोरात्र लढणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना प्रोत्साहीत करणार्या ऐवजी वेतन कपात करणे अन्यायकारक असून त्याविरोधात नाईलाजाने राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल
नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी जवळच्या घुबडी गावात शेततळ्यात बुडून दोन मुलींचा मृत्यू, भाग्यश्री येडमे 12 वर्ष आणि अर्चिता मंगाम 11 वर्ष अशी मृत मुलींची नावं,
दोन्ही मुली आज दुपारी सेवकरम परतेती यांच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या
मुंबईत सातत्याने कमी होत असलेल्या चाचण्या,त्यामुळे संसर्ग शोधण्यात येत असलेल्या अडचणी,मृत्यूसंख्येची अद्याप होत नसलेली फेरपडताळणी,मृतदेहांची कोरोना चाचणी होत नसल्यामुळे कोरोना योद्ध्यांनाच मदतीपासून वंचित रहावे लागणे-तातडीने लक्ष देण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

आज सलग तिसऱ्या दिवशी परभणी शहरासह अनेक तालुक्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. आज सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालाय. परभणी, सेलु, जिंतुर तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. मानवत, पाथरी, पूर्णा तालुक्यात पावसाची रिपरिप सुरुय.
होमीओपॅथीच्या गोळ्यांची राज्य पातळीवर खरेदी होणार नाही.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होमियोपॅथीच्या गोळ्या केंद्रीय पध्दतीने खरेदी करण्याचा राज्याच्या ग्रामविकास विभागाचा निर्णय रद्द झाला आहे. अश्या गोळ्या खरेदी करण्यासाठी गावांच्या विकासकांमासाठीचा अर्खीत निधी राज्य पातळीवर केला गेला जात होता.
मुंबई : लॉकडाऊन वाढवल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर, मिशन बिगीन अगेनची घोषणा करून पुन्हा लॉकडाऊन कायम ठेवल्याबाबत महाविकास आघाडीतल्या मंत्रिमंडळात मतभेद, निर्णय घेण्याआधी मंत्र्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार
लडाखमध्ये भूकंपाचे धक्के, 4.5 रिष्टर स्केल भूकंपाची नोंद, भूकंपाचं केंद्र जमीनीच्या खाली 25 किलोमीटर असल्याची माहिती, कुठलीही जीवित तथा वित्तहानी झाली नसल्याची माहिती
डिजीटल साताबारा प्रमाणे महाराष्ट्रात डिजीटल शहरी मालमत्ता तपशील मिळणार. त्यासाठीची इ-पीसीआयएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व शहरातल्या मालमत्तेच्या डिजीटल प्रत त्यातून मिळतील. त्यासाठी महानगरात १३५ रूपये अ,ब,क पालिकेसाठी ९० रूपये आणि ग्रामीण भागातल्या मालमत्तेसाठी ४५ रूपये भरवे लागतील.
कोल्हापुरात 'आमचं ठरलंय विकास आघाडी'ची स्थापना होणार? ,

कसबा बावडा इथल्या प्रमोद पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे केला नोंदणीसाठी अर्ज ,

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यभर गाजला 'आमचं ठरलंय' पॅटर्न
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 206 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 122 पुरूष, 83 महिला, आतापर्यंत एकूण 5988 कोरोनाबाधित आढळले, 2857 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले . 271 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 2860 रुग्णांवर उपचार सुरू .
जालना जिल्ह्यातील मंठा येथे मंगळवारी प्रेम प्रकरणातून नवंविवाहित तरुणीच्या झालेल्या हत्येच्या निषेधार्थ आज मंठा शहर बंद चे आवाहन करण्यात आल,सर्व समाज बांधवांनी या हत्येचा निषेध म्हणून हा बंद ठेवण्यात आला,आज मंठा शहरात व्यापाऱ्यांनी या बंद ला पाठिंबा दर्शवित आपली सर्व दुकाने बंद ठेवलेली पाहायला मिळत आहेत..मंगळवारी भर दिवसा वैष्णवी गोरे या नुकताच लग्न झालेल्या मुलीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ला ताब्यात घेतले असून त्याने विष पियुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने त्यावर जालना शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत..
कारागृहात फैलावणाऱ्या कोरोना संदर्भातील याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर,

राज्यातील कारागृहातही कोरोनाबाबत आयसीएमआरनं आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करा - हायकोर्ट,

कैदी कोरोनाबाधित आढळल्यास त्याच्या कुटुंबियांना तातडीनं कळवणं जेल प्रशासनाला बंधनकारक ,

कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या कैच्या कैद्यांबाबतही आयसीएनआरनं आखून दिलेले निर्देश पाळण्याचे आदेश
गलवान खोऱ्यातून टप्प्याटप्प्यानं हटणार भारत-चीनचं सैन्य, कमांडर लेव्हलच्या तिसऱ्या बैठकीत निर्णय, भारत आणि चीन लडाखच्या गलवान खोऱ्यातील गोगरा हॉट स्प्रिंग मुद्दा शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यास तयार झाले आहेत. दोन्ही देश पूर्व लडाखमधून हळूहळू आपलं सैन्य वापस घेतील.
बुलडाण्याच्या देऊळगाव राजा येथील एका नागरिकाला जालन्यातील महिलेसोबत झालेल्या मैत्रीचे व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या जालन्यातील एका महिलेसह दोन जणांना मंगळवारी 30 जून रोजी रात्री देऊळगांवराजा येथे रात्री बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.
आशिष शेलार यांची लालबागचा राजाची 87 वर्षांची परंपरा खंडित न करण्याची मागणी. शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा करण्याचे आवाहन. गणेशभक्तांची आणि राजाची ताटातूट का करताय? सरकारला प्रश्न.
कोरोना आजारातून बरे झालेल्या व्यक्तीने आत्महत्या केली असून
दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथे ही घटना घडली आहे. या व्यक्तीला 1 जुलै रोजी बरं झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं होतं. अशातच आज या व्यक्तीने आत्महत्या केली आहे. बोरीपार्धी येथे रेल्वे खाली येवून व्यक्तीने आत्महत्या केली आहे. 24 जूनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून सुरू झालेल्या लॉक डाऊन मुळे पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. जी वाहने अनावश्यक कारणासाठी बाहेर पडली आहेत त्यांच्यावर पोलीस कारवाई करत आहेत. त्याचप्रमाणे राज्य सरकारने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या वाहनांवर देखील कारवाई केली जात आहे. अशीच एक नाकाबंदी पूर्व द्रुतगती मार्गावर आनंद नगर येथे आहे. त्या ठिकाणी पोलीस मुंबई जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करत आहेत. या नाका बंदी मुळे काही वेळासाठी मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. याचे दुसरे कारण म्हणजे कोपरी पूलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहनांना जाण्यासाठी अतिशय कमी रस्ता आहे. त्यामुळे देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी येथे झाली आहे. मात्र पोलिसांनी अतिशय चांगल्या प्रकारे शहरात लॉक डाऊन ची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यात रात्रभरात 217 नवीन कोरोना रुग्णांची नोंद. पुण्यातील रुग्णांची संख्या 23897 तर आत्तापर्यंत 788 कोरोना बाधितांचा मृत्यू,
एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 14494 वर
कल्याण :
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत लॉक डाऊनला सुरुवात.

बाहेरून येणाऱ्या सर्व चारचाकी आणि दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी .

गरज असणाऱ्या वाहनांना कल्याण-डोंबिवलीच्या हद्दीत सोडलं जात आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या सर्व एन्ट्री पॉईंट वर मोठा पोलिस बंदोबस्त.
देशात कोरोनाबाधितांची संख्या ६ लाखांच्यावर



देशात गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार १४८ ने वाढली तर मृतांचा आकडा ४३४ ने वाढला



देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ६ लाख ४ हजार ६४१,

त्यापैकी एकूण ३ लाख ५९ हजार ८६० रुग्ण बरे झाले आहेत.

म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट ५९.५१ टक्के

गेल्या २४ तासात ११ हजार ८८१ रुग्ण बरे झाले.

सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण २ लाख २६ हजार ९४७

देशात एकूण मृतांची संख्या १७ हजार ८३४



१ जुलै जून पर्यंत देशात ९० लाख ५६ हजार १७३ चाचण्या झाल्या आहेत.

काल देशात २ लाख २९ हजार ५८८ चाचण्या झाल्या
न्यूझीलंडचे आरोग्यमंत्री डेविड क्लार्क यांनी राजीनामा दिला आहे.

गेले काही दिवस वादाच्या केंद्रस्थानी होते.

कोरोनाची परिस्थिती हाताळताना त्यांच्याकडून चुका झाल्याचं बोललं जात होतं.

न्यूझीलंड देश कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केल्यानंतर काही दिवसातच एका क्वारंटाईन केंद्रात नियम मोडून काही लोकांना बाहेर सोडलं गेलं , तसंत तिथे काही रुग्ण आढळल्यानं आरोग्य मंत्री क्लार्क टिकेचे धनी झाले होते.

लॉकडाऊनचे नियम मोडल्याचा त्यांच्यावर ठपका होता.

आपल्या कुटुंबाला घेऊन ते २० किलोमीटर दूरवरच्या बीचवर गेले होते.

त्यांनी आधीच राजीनामा दिला होता पण कोरोनाकाळातील ताण लक्षात घेऊन तो मंजूर केला नव्हता.

अखेर काल न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डेर्न यांनी राजीनामा स्वीकारला.
ठाण्यात आज सकाळी सात वाजल्यापासून लॉक डाऊन सुरू झालेला आहे. ठाणेकर देखील लॉक डाऊन पाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाण्यााातील वागळे इस्टेट, आनंद नगर, कोळीवाडा, चिंतामणी चौक या परिसरात तुरळक गर्दी दिसून आली. तसेच भाजीपाला आणि धान्य मार्केट जरी सुरू असले तरी ठाणेकर मात्र याकडे फिरकलेले नाहीत. जांभळी नाका येथील भाजीपाला मार्केट सकाळी 6 ते 11 सुरू ठेवण्याची परवानगी आहे तर धान्य मार्केट सकाळी 8 ते 1 वाजेपर्यंत सुरू राहील. या दोन्ही बाजारपेठा बंद राहतील असे आधी सांगण्यात आले होते. मात्र आता ते देखील सुरू करण्याची परवानगी दिली गेलीय
वर्धा : सैनिकासह पत्नीचा मृत्यू , सैनिकाने पत्नीला गोळी मारत स्वतः आत्महत्या केल्याचा अंदाज, पुलगाव येथील घटना,

पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू तर पती सैनिकाचा उपचारादरम्यान मृत्यू

, मध्यरात्रीनंतरची घटना

,अजय कुमार सिंग अस सैनिकाचं नाव तर प्रियांका कुमारी पत्नीचं नाव

, मूळचे बिहार राज्याचे
औरंगाबाद विना मास्क फिरणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल.स्वतः
मनपा आयुक्तांनी गाड्या अडवत केले गुन्हे दाखल. शहरात 7 जणांविरोधात गुन्हे दाखल..
भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाखांच्या वर तर जगभरात एक कोटी आठ लाख कोरोनाबाधित, अमेरिकेत 24 तासात 50 हजारांच्या वर कोरोनाबाधित
बीड शहर पुढील सात दिवसासाठी पूर्णपणे लॉकडाऊन, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचा निर्णय, बीड शहरात कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले होते. यातील एका रुग्णाने बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याचे समोर आलंय

सांगली जिल्ह्यात दिवसभरात तब्बल 21 नवे कोरोना रुग्ण, जिल्ह्यातल्या अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 152 वर, आतापर्यंत जिल्ह्यात 405 कोरोना रुग्णांची नोंद
राज्याचे नवनियुक्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज (दि.1) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राज भवन मुंबई येथे सद‍िच्छा भेट घेतली. मुख्य सच‍िव पदाचा कार्यभार स्वीकारल्याानंतर संजय कुमार यांची ही राज्यपालांसोबतची पहिलीच भेट होती.
गिलगीट बाल्टिस्तान सीमाभागात पाकिस्तानकडून 20 हजार सैन्य तैनात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पैठण येथील संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा शासनचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले.
वर्धा- शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करून प्रहारच्या कार्यकर्त्यांचा बँकेत राडा, आष्टी तालुक्यातील साहूर येथील बँक ऑफ इंडिया शाखेत घडला प्रकार, बँक अधिकाऱ्यांसोबत बातचीत करत असताना वाद वाढून वादावादी झाली


मंगळवारी कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या एका रुग्णाने बीड मधील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतला होता. त्या रुग्णालयाच्या माध्यमातून सदर रुग्णाचा अनेकांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क आल्याचा धोका असल्याचे सांगत बीड शहर पुढील सात दिवसासाठी पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे.
पुणे : धायरीत सिग्नलला थांबलेल्या वाहनांवर पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक दिल्याने पुढील पाच वाहने एकमेकांवर आदळल्याने वाहनांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ह्या विचित्र अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना सकाळी सव्वानऊच्या सुमारास नऱ्हे येथील नवले पुलाजवळ घडली. ह्याबाबत धीरज देविदास लोखंडे यांनी फिर्याद दिली असून ट्रक चालक दशरत राठोड याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसटी महामंडळाला झाली उपरती; निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यासाठी आरक्षित बसचे पैसे देवस्थानला केले परत. तीन दिवसांसाठी शिवशाही बसचे 70 हजार रुपये भाडे आकारले होते. शासनाचे स्पष्ट निर्देश नसल्यानं सुरुवातीला पैसे घेतल्याचा खुलासा. सरकारच्या निर्देशानुसार 70 हजार रुपयांचा धनादेश देवस्थानला परत केला आहे. पंढरीच्या वारीसाठी संत निवृत्तीनाथ देवस्थानकडून आकारले होते पैसे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचं संकट अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहे. मुंबई, पुणे शहरातून मूळ गावी येणाऱ्यांची संख्या मोठी असताना शिरकाव आटोक्यात आणला. 24 तास आमचे पोलीस कर्मचारी रस्त्यावर काम करत आहेत. उत्पादन शुल्क विभागाने देखील गोव्यातून येणारा अवैध मद्यसाठा मोठ्या प्रमाणात जप्त केला : शंभुराजे देसाई
UPSC ची 4 ऑक्टोबरला होणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलता येणार; केंद्रीय लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय.
मुंबई-नाशिक महामार्गावर अचानक टायर फुटल्याने चारचाकी कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, टायर फुटल्यानंतर चारचाकी कार गोलांट्या खात विरुद्ध दिशेच्या मार्गावर येऊन आदळली. महामार्गावरील वाळकस गावानजीक हा अपघात घडला. अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
परभणीच्या गंगाखेड येथील संत जनाबाई यांच्या पालखीचा सोहळा तब्बल 48 वर्षात पहिल्यांदाच कोरोनामुळे रद्द करावा लागला आहे. त्यामुळे स्थानिक वारकरी, भक्तांच्या मनात विठूरायाला न भेटल्याची खंत आहे. परंतु यंदा संत जनाबाईंचे मंदिर हे आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे. सकाळी मंदिरात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत समाधी, पादुकांचा अभिषेक करून 5 वारकऱ्यांच्या हस्ते गाव मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी सोशल डिस्टंसिंग पाळून हे कार्यक्रम पार पडले. संत जनाबाई मंदिरात गर्दी न करू देता 4-4 माणसांना प्रवेश देऊन दर्शन घेऊ देण्यात आले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वात उंच विठ्ठल मूर्तीचंही दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील वाटूरमध्ये 51 फुट विठ्ठलाच्या मूर्तीची मागच्या वर्षी स्थापना करण्यात करण्यात आली होती. मागच्याच्या वर्षी आढाषी एकादशीला याठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळं प्रति पंढरपूर या ठिकाणी मोठी गर्दी होऊ लागली. मात्र सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील सर्व देवस्थानं बंद करण्यात आली आहेत. याच कारणामुळे याठिकाणी गर्दी होवू नये म्हणून यावेळी या सर्वात उंच विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं आहे. मात्र काही भाविक दूर वर गेटवरूनच दर्शन घेवून परतत आहेत.

सीमा भागात मराठी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी समितीची स्थापना, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत महाविद्यालय / विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापण्यासाठी कुलगुरू डॉ. करमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन, मंत्री उदय सामंत यांची माहिती
रायगड : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ अपघात, सहा वाहनं एकमेकांवर आदळल्याने अपघात, 5 मोठे ट्रक आणि कंटेनर याचा अपघात, जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि गाड्या बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू
रायगड : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ अपघात, सहा वाहनं एकमेकांवर आदळल्याने अपघात, 5 मोठे ट्रक आणि कंटेनर याचा अपघात, जखमींना बाहेर काढण्यासाठी आणि गाड्या बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू

शासनातर्फे पंढरपूर नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचे यात्रा अनुदान
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडतोय. आज पहाटे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून विठ्ठल बडे यांना पूजेचा मान मिळाला.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडतोय. आज पहाटे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून विठ्ठल बडे यांना पूजेचा मान मिळाला.
दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडतोय. आज पहाटे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यंदा मानाचे वारकरी म्हणून विठ्ठल बडे यांना पूजेचा मान मिळाला.
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातही फुलांची आकर्षक सजावट
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट
आज आषाढीपासूनच कोरोनाचं संकट नष्ट होऊदे हे विठुरायाकडे साकडं: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आज आषाढीपासूनच कोरोनाचं संकट नष्ट होऊदे हे विठुरायाकडे साकडं: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न
विठ्ठल -रखुमाईच्या शासकी पूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे मंदिरात दाखल

पार्श्वभूमी

मुंबई : जगभरातील अनेक वैज्ञानिक या व्हायरसवर प्रतिबंध घालण्यासाठी लस शोधण्याचा प्रयत्नात आहेत. अशातच भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांची संख्या 20 हजाराने वाढली आहे. देशात गेल्या 24तासांत कोरोनाबाधितांची संख्या 20 हजार 903 ने वाढली तर मृतांचा आकडा 379 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 6 लाख 25 हजार 544 झाला आहे.


त्यापैकी एकूण 3 लाख 79 हजार 892 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 60.72 टक्के आहे. गेल्या 24 तासात 20 हजार 32 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 2 लाख 27 हजार 439 इतके आहेत. देशात एकूण कोरोनामुळं मृतांची संख्या 18 हजार 213 झाली आहे. 20 जुलै पर्यंत देशात 92  लाख 97 हजार 749 चाचण्या झाल्या आहेत.


बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शका सरोज खान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मुंबईच्या वांद्र्यातील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी वयाच्या 71 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सरोज खान यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. ती निगेटिव्ह आली होती. मात्र गुरुवारी मध्यरात्री त्यांना अत्यवस्थ वाटू लागले आणि रात्री दोनच्या सुमारास उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली.



 

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.