Corona Vaccine Pune : पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना काळजी (Corona update) घेण्याचं आवाहन महापालिकेकडून (Vaccination) करण्यात आलं आहे. राज्यात आणि पुण्यात एकीकडे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे लसीकरण ठप्प असल्याचं समोर आलं आहे. पुण्यानंतर आता पिंपरी-चिंचवडमध्ये लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण ठप्प आहे. 

Continues below advertisement

मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिक खबरदारी म्हणून लसीकरण करुन घेत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने लसीकरणाला वेग आला. मात्र आता रुग्णालयात पुरेशा लसी उपलब्ध नाहीत. त्यामुळे लसीकरण ठप्प झालंं आहे. नागरिकाना लसी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बूस्टर डोस घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. शहरात आतापर्यंत केवळ 2,38,523 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. सध्या बाधितांची संख्या वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आठ केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, लसींचा साठा संपल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे.

पुण्यात कोरोना वॉर्ड सुरु 

पुणे शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ होत असल्याचे दिसत आहे. यामुळे पुण्यातील काही रुग्णालयांनी पुन्हा एकदा कारोना वॉर्ड सुरु केले आहेत. नोबेल हॉस्पिटल, के. ई. एम रुग्णालय आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात देखील कोरोना रुग्णांना विलिगीकरणात ठेवले जात आहे. रुग्णसंख्या झापाट्याने वाढली तर रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरुवातीपासूनच खबरदारी घेतली जात आहे

Continues below advertisement

काळजी घ्या...

मागील काही दिवसांपासून पुण्यात सतत वातावरणात बदल होत आहे. याच बदलत्या वातावरणामुळे पुणेकरांना सर्दी खोकल्याचा त्रास होत आहे. यात लहान मुलांमध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये वेगवेगळी लक्षणं जाणवत आहे. त्यामुळे पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासोबतच मास्क वापरण्याचंही आवाहन करण्यात आलं आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहता गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नीती आयोगाने केलं आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात येत आहे. घाबरुन जाणू नका, तर खबरदारी घ्या, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.