मुंबई : राज्यात आज 6 हजार 555 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 2 लाख 6 हजार 619 इतकी झाली आहे. आज नवीन 3 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 1 लाख 11 हजार 740 रुग्णांना बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान राज्यात एकूण 86 हजार 40 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तर राज्यभरात आज 151 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. वाढत्या रुग्ण संख्येने प्रशासनच्या चिंता वाढल्या आहेत.


आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 11 लाख 12 हजार 442 नमुन्यांपैकी 2 लाख 6 हजार 619 (18.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 4 हजार 463 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 46 हजार 62 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.


दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 3 हजार 658 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.08 टक्के एवढं आहे. राज्यभरात आतापर्यंत 1 लाख 11 हजार 740 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आज 151 करोनाबाधित रुग्णाांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.49 टक्के एवढा आहे.


संबंधित बातम्या




Anti Covid Shop Pune | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या वस्तू एकाच दुकानात,पुण्यात खास अॅंटी कोविड शॉप