मुंबई : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी 5 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. आज राज्यात आज 5 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल राज्यात 5318 तर परवा 5024 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 64 हजार 626 वर पोहोचली आहे. यापैकी 86 हजार 575 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकट्या मुंबईत आज 1287 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर पुण्यात 867 रुग्णांची नोंद झाली आहे.

काहीशी दिलासादायक बाब म्हणजे आज एकूण 2 हजार 330 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 52.59 टक्के एवढं आहे. राज्यात आज 156 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 60 मृत्यू मागील 48 तासातील आहेत, तर उर्वरित 96 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 64, ठाणे 24, जळगाव 6, जालना 1 आणि अमरावतीमधील एका मृत्यूचा समावेश आहे.

राज्यात आत्तापर्यंत 9 लाख 23 हजार 502 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली असून त्यातील 1 लाख 64 हजार 626 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.17.82 टक्के इतके हे प्रमाण आहे. राज्यात सध्या 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात सध्या 5 लाख 70 हजार 475 लोक होम क्वॉरंटाइनमध्ये आहेत. तर 37 हजार 350 लोक संस्थात्मक क्वॉरंटाइनमध्ये आहेत.

CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे