नाशिक : कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात कर्फ्यू आदेश जारी करण्यात आले आहेत. एकट्या मालेगावात 36 कोरोना रुग्ण आढळताच संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने हे कठोर पाऊल उचलले आहे. आज सकाळी 7 वाजेपासून 30 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत मालेगावात पूर्णतः संचारबंदी असणार आहे.
आजपासून मालेगावमध्ये सर्व बँक 5 दिवस बंद राहणार आहेत. शहर तसेच मालेगाव हद्दीपासून 2 किमी परिघातील सर्व पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत. तसेच हातगाडीवरुन भाजी विक्री आणि किराणा दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. या कर्फ्यूमधून वैद्यकीय सेवा, दूध व चारा आणि गॅस एजन्सी यांना वगळले आहे.
या कर्फ्यूदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी शहरात 502 पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखील पोलिस दलाच्या 4 तुकड्या दाखल यासोबतच इतर जिल्ह्यातून अतिरिक्त फौजफाटाही दाखल झाला आहे. मालेगावात आजपर्यंत विनाकारण फिरणाऱ्या 300 वाहन चालकांकडून 58 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
Coronavirus | मालेगावात अचानक कोरोना बाधितांचा आकडा कसा वाढला?
मालेगावात काल 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच दिवसेंदिवस संशयितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मालेगावात आत्तापर्यंत कोरोनाचे 2 बळी गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण 42 बाधित आहेत यापैकी 36 मालेगावात तर नाशिक शहरात 3, सिन्नर 1, चांदवड 1, लासलगावमध्ये एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे.
मालेगाव शहरात यंत्रमागावर काम करणारे लोक असून अत्यंत दाटीवाटीच्या घरांमध्ये ते राहत असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, तर यंत्रमागाच्या तयार होणाऱ्या कापडाचे बारीक कण हे नाकावाटे, तोडा वाटे कामगार तसेच नागरीकांच्या तोंडात जात असल्याने दम्यांचे आजार होतात. कदाचित त्यामुळे कोरोना बाधितांना त्याचा अधिक संसर्ग वाढत असल्याचं बोललं जात आहे.
सहा एप्रिलला सामान्य रुग्णालय मालेगाव येथे दाखल झालेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सोबतच आणखी चार जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले होते. एकाच वेळी पाच रुग्ण सापडताच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव गाठत कृषी मंत्री आणि यंत्रणेसोबत बैठक घेत सर्व आढावा घेतला होता.
कोरोना हॉटस्पॉट मालेगाव शहरात संपूर्ण संचारबंदी आदेश जारी
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
15 Apr 2020 08:32 AM (IST)
मालेगावात काल 5 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तसेच दिवसेंदिवस संशयितांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मालेगावात आत्तापर्यंत कोरोनाचे 2 बळी गेले आहेत.
प्रतिकात्मक छायिचित्र
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -