मुंबई : कोरोनाच्या काळात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे हे वाढवलेले खतांचे दर केंद्र सरकारने कमी करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी एका पत्राद्वारे केली आहे. केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ केली आहे.
गेल्या दीड वर्षापासून शेतीची कामं जरी सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्याने त्याचा फटका बहुतेक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. ज्या पद्धतीने रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे ती अव्वाच्या सव्वा आहे आणि ती शेतकऱ्याला परवडणारी नाही. बऱ्याच खतांच्या किंमतीत 700 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. सध्याची कोरोनाची स्थिती पाहता ही दरवाढ तातडीनं मागं घ्यावी अशी विनंती कृषी मंत्री दादा भुसे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासाठी आपण सातत्याने पाठपूरवठा करु आणि केंद्र सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला लावू असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केलं.
खतांचे वाढलेले नवीन दर काय आहेत?
इफको 10:26:26 चा जुना दर हा 1175 रुपये इतका होता, तो आता 1775 रुपये इतका झाला आहे. इफको 10:32:16 चा जुना दर हा 1190 इतका होता आता तो 1800 रुपये इतका झाला आहे. इफको 20:20:00 चा जुना दर हा 975 रुपये इतका होता तो आता वाढून 1350 रुपये इतका झाला आहे. डीएपी खताचा जुना दर हा 1875 रुपये इतका होता, तो आता 1900 रुपये इतका झाला आहे. आयपीएल डीएपी खताची जुनी किंमत 1200 रुपये होती ती आता 1900 रुपये इतकी झाली आहे. आयपीएल 20:20:00 ची जुनी किंमत ही 975 रुपये इतकी होती, ती आता 1400 रुपये इतकी झाली आहे. पोटॅशच्या एका पोत्याची किंमत आधी 850 रुपये होती, ती आता 1000 रुपये करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Black Fungus : रेमडेसिवीरनंतर आता ब्लॅक फंगसचे इंजेक्शन बाजारातून गायब, काळाबाजार होत असल्याची शक्यता
- Cyclone Tauktae : काय आहे 'तोक्ते'चा अर्थ? जाणून घ्या या चक्रीवादळासंबंधीची महत्त्वाची माहिती
- Bhendwal Bhavishyavani : सर्वसाधारण पाऊसमान, पिकांना भाव मिळणार नाही, तर यंदाही रोगराईचं संकट; भेंडवळची भविष्यवाणी जाहीर