नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगसच्या रुपाने नवीन संकट उभं राहिलं आहे. सध्या बाजारात ब्लॅक फंगसवर मिळणारे इंजेक्शन, Liposomal amphotericine B बाजारात उपलब्ध होत नसून त्याचा  तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे देशात रेमडेसिवीरचा काळा बाजार करण्यात आला त्या पद्धतीनेच आता ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


ब्लॅक फंगसच्या इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी सांगितलंय की या आधी यावरच्या इंजेक्शनची मागणी जास्त नव्हती. त्यामुळे त्याचे उत्पादनही अत्यंत कमी प्रमाणात केलं जायचं. आता अचानक एवढी मागणी वाढली आहे की त्या प्रमाणात सध्या पुरवठा होत नाही. त्यामुळे याचा साठेबाजार होत असून ते बाजारातून गायब झाले आहे. 


या इंजेक्शनसाठी लागणारा कच्च्या मालाची कमतरता असल्यानेही याचे उत्पादन कमी असल्याचं सांगण्यात येतंय. ब्लॅक फंगसवर मिळणारे इंजेक्शन, Liposomal amphotericine B ची किंमत जवळपास पाच ते आठ हजारांच्या घरात आहे. 


कोरोनातून बरे झाल्यानंतर लोकांमध्ये ब्लॅक फंगसचा आजार होत असल्याचं समोर आलं आहे. खासकरून, ज्यांना डायबेटिसचा त्रास आहे त्यांना या आजाराची लागण होत असल्याचं दिसून येतंय. 


काय आहे  ब्लॅक फंगस? 
कोरोना उपचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते.  सामान्यतः श्वास घेताना युब्युक्युटस नावाचे जीवाणू नाकामध्ये जातात. परंतु रोगप्रतिकार शक्ती संतुलीत नसेल तर म्युकोरमायकॉसिस या बुरशीची वाढ होते.  कोरोनानंतर व्यक्तीमधील रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच मधुमेह किंवा इतर सहव्याधी असलेल्या लोकांमध्ये या बुरशीच्या संसर्गाची शक्यता आहे. चेहऱ्यावर सूज येणे, गाल दुखणे, डोळे दुखणे, डोळ्यांना सूज येणे, डोके दुखणे, नाक दुखणे, रक्ताळ किंवा काळसर जखम ही सर्व म्युकोरमायकॉसिसची लक्षणं आहेत.


महत्वाच्या बातम्या :