नंदुरबार : दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपींचा महापूर बघायला मिळाला आहे. अक्कलकुव्यातील परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्याने बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
आज नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील एस.जे.एम.एस ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या सामूहिक कॉपीचा प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर प्रत्येक परीक्षा केंद्राजवळच सर्रासपणे कॉपींची विक्री होत असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे. मात्र सारं काही खुलेआम होत असूनही या सगळ्या प्रकाराकडे जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाचं दुर्लक्ष होतंय की केलं जातंय हा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान अक्कलकुव्यातील या परीक्षा केंद्रावर आज शिक्षण खात्याचे अधिकाऱीदेखील अनुपस्थित होते अशी माहिती मिळत आहे.
नंदुरबारमध्ये परीक्षा केंद्रावर कॉपींचा सुळसुळाट, केंद्राशेजारीच कॉपींची विक्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Mar 2018 05:21 PM (IST)
दहावी आणि बारावीच्या परीक्षेतील कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र आहे. नंदुरबार जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपींचा महापूर बघायला मिळाला आहे. अक्कलकुव्यातील परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपीचा प्रकार आढळल्याने बोर्डाच्या अभियानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -