वाढत्या उकाड्यामुळे अमरावतीकर नवनवीन प्रयोग करताना दिसत आहेत. अमरावतीचा पारा 45 अंशापार गेल्यापासून अमरावतीकर विविध प्रयोग करताना दिसत आहेत. अमरावतीमधील महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या 33 केवी केंद्रामध्येही अशीच शक्कल लढवण्यात आली आहे. अमरावतीतील पॉवर ट्रान्सफार्मरला चक्क कुलर लावण्यात आले. पॉवर ट्रान्सफॉर्मरमधील ऑईलचं तापमान थंड करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनोखी शक्कल लढविली आहे.
पॉवर ट्रान्सफॉर्मर हे जर थंड राहीले तरच अमरावतीकरांना अखंडित वीज पुरवठा होईल आणि या दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरची किंमत जवळपास एक कोटी रुपये आहेत. त्यासाठी ही अनोखी शक्कल लढविण्यात आली.