अहमदनगर : अहमदनगरमध्ये रविवारी रात्री दोन गटात पूर्ववैमनस्यातून राडा झाला. विजय रासकर आणि सुरेश आंबेकर गटात एकमेकाकडे खुनशीने पाहण्यावरुन वाद झाला. सारसनगर परिसरात जमावानं दगडफेक करुन मारहाण केली आहे. या दगडफेकीत एक महिला जखमी झाली असून दोन ते तीन दुचाकींची मोडतोड झाली.


या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात मध्यरात्री परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला. या  प्रकरणी  शिवप्रसाद शिंदे यांनी तक्रार दिली.

सारसनगरच्या पुलावरुन जाताना आंबेकर मळ्याजवळ प्रकाश आंबेकरसह दोघांनी गाडीची चावी काढून मारहाण केली. गळ्यातील चैन, खिशातील पैसे आणि दुचाकीची मोडतोड केल्याची तक्रार दिली.

तर दुसरी तक्रार सुरेश आंबेकर यांनी दिली. घरासमोर कुटुंबीयांसह बसलो असताना अचानक वीज बंद करुन रासकर यांच्यासह 18 जणांनी  शिवीगाळ मारहाण आणि दगडफेक केल्याची तक्रार दिली.

या प्रकरणी दोघांच्या तक्रारीवरुन दंगल, गैरकायदा मंडळी गोळ करुन सार्वजनिक मालमत्तेचं नुकसनसह गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीसांनी विजय रासकर आणि आंबेकरसह दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे.