नांदेड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेच्या आमदार आणि खासदारामध्ये बाचाबाची झाली. नांदेडमध्ये आयोजित शेतकरी संवाद सभेच्या व्यासपीठावर हा प्रकार पाहायला मिळाला.

नांदेडचे शिवसेना आमदार हेमंत पाटील आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यात उद्धव ठाकरेंच्या समोरच वाद झाला. शेतकरी संवाद सभेत उद्धव ठाकरे व्यासपीठावर हा प्रकार घडला.

नेमकं काय झालं?

नांदेडमध्ये शेतकरी संवाद सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. तेव्हा आमदार हेमंत पाटील माईकवरुन पक्षप्रमुखांचे स्वागत करत होते. त्याच वेळी खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी आले. दुसऱ्याला माईक देण्याची सूचना राऊत यांनी आमदार हेमंत पाटील यांना केली. पण माईक सोडण्यास हेमंत पाटील तयार नव्हते. माईक सोडायला सांगणाऱ्या राऊत यांना व्यासपीठावरच हेमंत पाटील यांनी झिडकारुन लावले. या दोन नेत्यांमधील वादामुळे शिवसेनेतील गटबाजी चव्हाटयावर आली आहे.