रायगड : रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील इमॅजिका अम्युझमेंट पार्कमध्ये आगीच्या निखाऱ्यावर चालण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येत आहे. गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी चक्क आगीच्या निखाऱ्यावरुन चालण्याचा विक्रम करण्यात येत आहे. वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी आतापर्यंत सुमारे 1200 स्पर्धक आगीच्या निखाऱ्यावरुन चालले आहेत. गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद व्हावी, असा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना या स्पर्धेत सहभागी करुन घेण्यात येतं आहे. या थरारक स्पर्धेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. त्यामुळे या स्पर्धेत अजून किती स्पर्धक सहभागी होतात, आणि विक्रमांची गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाते का, ते पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.