'मुख्यमंत्र्यांनी प्रकाश मेहतांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी.' अशी भूमिका काँग्रेसनं घेतील आहे. तसंच उद्या विधीमंडळात या प्रश्नी आवाज उठवणार असल्याचंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं.
महाडमध्ये मृतांच्या नातेवाईकांना प्रशासन कुठलीही माहिती देत नाही. त्यामुळं आधीच आप्तस्वकियांना गमावलेल्या नातेवाईकांचा बांध फुटला आहे. आणि याच विषयावर प्रकाश मेहता यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट साम टिव्हीच्या पत्रकाराला धमकी दिली.
इतकंच नाही तर पत्रकाराला मारझोड करण्यासाठी ते कार्यकर्त्यांना चिथावत होते. ही सगळी दृश्यं कॅमेऱ्यात कैद होत असल्याची जाणीव होताच चित्रीकरण बंद करण्यासाठी मेहतांचे कार्यकर्ते थेट पत्रकाराला धक्काबुक्कीही करत होते.
आधीच सरकारच्या ढिसाळपणामुळं 30 लोकांनी जीव गमावावा लागला आहे. तर, आता मंत्रीच पत्रकारांना धमक्या देऊ लागले आहेत. त्यामुळं भाजपच्या मंत्र्यांना सत्तेची नशा डोक्यात गेली आहे का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.