LIVE - तुमची झेडपी, तुमचा अध्यक्ष
LIVE : झेडपी निवडणूक : जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा? भाजपचा अध्यक्ष बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा खासदार ड्रायव्हिंग सीटवर! काँग्रेसच्या मदतीने भुजबळांच्या गडावर शिवसेनेचा झेंडा सोलापुरात काँटे की टक्कर, जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी की भाजप? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या 5 सदस्यांचं भाजपला मतदानजळगाव झेडपीत काँग्रेसची भाजपला साथ, शिवसेना-राष्ट्रवादी पराभूत
एबीपी माझा वेब टीम | 21 Mar 2017 06:18 PM (IST)
जळगाव: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभद्र युती पाहायला मिळाली. असाच प्रकार जळगावमध्येही दिसून आला. जळगावमध्ये चक्क भाजप-काँग्रेस आणि शिवसेना-राष्ट्रवादी अशी अभद्र युती-आघाडी पाहायला मिळाली. दरम्यान, इथं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सरशी झाली आहे. जळगावमध्ये काँग्रेसच्या सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला. भाजपच्या उज्वला पाटील या निवडून आल्या आहेत. अध्यक्ष निवडणुकीत भाजपला बहुमतासाठी एका सदस्याची गरज होती. अशावेळी काँग्रेसच्या 4 सदस्यांनी भाजपला मतदान केलं. त्यामुळे भाजपच्या उज्वला पाटील या 37 विरुद्ध 27 मतांनी विजयी झाल्या. भाजपच्या उज्वला पाटीला यांनी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या अनिता पाटील यांचा पराभव केला. 67 सदस्यांच्या या जिल्हा परिषदेत 34 ही मॅजिक फिगर होती. भाजपचे 33, राष्ट्रवादी 16, शिवसेना 14, काँग्रेस 4 सदस्य होते. ऐनवेळी काँग्रेसनं भाजपच्या पारड्यात मत टाकल्यानं शिवसेना आणि राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. संबंधित बातम्या: