Congress Protest :  महागाई (Inflation) आणि बेरोजगारीविरोधात (Unemployment) आज (5 ऑगस्ट) काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केले. महाराष्ट्रातही काँग्रेसचं आंदोलन झालं. आंदोलनावेळी काँग्रेसच्या अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शुक्रवारी दुपारी काँग्रेसच्या नेते नाना पटोले,  पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, नसीम खान यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिक स्पष्ट केली. यावेळी नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलं. आज ईडी सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप नाना पटोले यांनी केला. गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतं आहे, असेही पटोले म्हणाले. 






यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात पाऊस झाला. परंतु अजूनही पंचनामे झाले नाहीत. आम्ही या सगळया बाबींच्या विरोधात आज आंदोलनं केलं. आज आम्ही अमची मीटिंग विधान भवनात करत होतो, त्याचवेळी आम्हाला पोलीसांनी ताब्यात घेतलं. एकट्या मुंबईत 10 हजारापेक्षा जास्त लोकांना पोलीसांनी ताब्यात घेतलं. 






राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना फरफडत पोलीस घेऊन गेले. आम्हीं शांततेत आंदोलन करतं होतो, परंतु तरीदेखील आम्हाला ताब्यात घेण्यात आलं. गांधी परिवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने होतं आहे. लोकशाही वाचवणं हा आमचा धर्म आहे. आम्ही ते करतं राहणार आहे, असे नाना पटोले म्हणाले. निर्मला सीतारामन म्हणतात देशात सगळं ठीक आहे. परिस्थिती वेगळी आहे. जनतेची लढाई आम्ही लढत राहणार आहोत. जनतेची हक्काची लढाई आम्ही लढत रहाणार अहोत, असेही पटोले म्हणाले. 


नाना पटोलेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे


- आज राहुल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन केलं
- माध्यम वर्गीय लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे
- अग्निपथ सारखी योजना काढली आणि शेतकरी आत्महत्या करत आहेत
- देशभर आम्ही हे आंदोलन करत होतो
- काल रात्री पासून आमच्या लोकांना पोलीस पकडायला सुरुवात करत होते
- पदयात्रेच नियोजन कसं करायचं हे आम्ही ठरवत होतो तिथे देखील पोलीस आली
- महाराष्ट्र मध्ये ईडीच सरकार आहे
- दहा हजरांच्या वर आमच्या लोकांना पकडण्याचं काम झालं
- जनतेचा आवाज घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरणार होती
- लोकशाही दाबण्याचा काम मोदी सरकारने केलं
- राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी खेचत न्हेलं
- ज्या पद्धतीने त्यांना अपमानित करण्याचं  काम या केंद्र सरकारने केलं त्याचा आम्ही निषेध करतो
या देशाची लोकशाही वाचवण आमचं काम आहे
- मूळ मुद्याला बगल हे सरकार देत आहे
- निर्मला सीतारामण यांनी देशाला अपमानित करणार वक्तव्य केलं आहे
- काँग्रेस हार कधी मानणार नाही ही आमची भूमिका आहे
- हे युद्ध आता सुरु झालेलं आहे
- जनतेसाठी काँग्रेस लढत आहे आणि लढाई काँग्रेस जिंकेल


दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. राहुल गांधी म्हणाले की, विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये संस्थांच्या जोरावर लढतो आणि या सर्व संस्था सरकारला पाठिंबा देत आहेत कारण भाजप-RSS ने आपले लोक या संस्थांमध्ये पेरले आहेत. त्यामुळे आमची लढाई फक्त भाजपशी नसून त्या पूर्ण व्यवस्थेशी आहे जिच्या जोरावर भाजप दडपशाही करतोय.