संगमनेर: भाजपचे नेते दोन वर्षात हेलिकॉप्टरमधून फिरायला लागले आहेत. त्यांना सत्तेचा माज आला आहे. अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी भाजपवर तोफ डागली आहे. तर इंदिरा गांधींनी गरिबी हटाओचा नारा दिला होता. मात्र भाजप गरीब हटाओची भूमिका घेत आहे. असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी नोटबंदी विरोधात आवाज उठवला आहे.

संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची सभा झाली. त्यावेळी काँग्रेसची महिला ब्रिगेड आक्रमक झालेली पाहायला मिळाली.

भाजपचे मंत्री दोन वर्षात हेलिकॉप्टरमधून फिरायला लागले: प्रणिती शिंदे

'लग्नासाठी पैसे काढायाचे तर लग्न कार्यालयाचा फोटो आणा, पोलिसांकडून एनओसी आणा, हे आणा, ते आणा... अरे काय सुरु आहे? अबकी बार पाकिटमार सरकार... काँग्रेसचे नेते गाड्या आणि रेल्वेनं प्रवास करतात. भाजपच्या मंत्र्यांना सत्तेत येऊन तीन वर्ष झाले नाही तर हे लोकं हेलिकॉप्टर आणि स्वत:च्या विमानानं फिरतात. कोणत्याही प्रकारचा गांभीर्य यांना नाही. सत्तेचा माज यांच्या डोक्यात गेला आहे.' अशी जोरदार टीका प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केली