Nagpur News नागपूर : ओबीसी आंदोलनाचा  (OBC Reservation) कालचा आठवा दिवस असून देखील अद्याप प्रशासनाकडून  या आंदोलनाची साधी दखली घेतल्या गेली नाही. आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणं, हे प्रशासनाचे आणि सरकारचं काम आहे. असे असताना आज महाराष्ट्रात 60% ओबीसी समाज असून त्यांच्या मागण्यांकडे ढूंकूनही न बघणे हा महाराष्ट्रातील तमाम 60% ओबीसींचा अपमान आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे. ते नागपूर (Nagpur News) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


सरकार म्हणून त्यांची भूमिका ही दुटप्पी आणि दुजाभावाची नसावी


ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे. मी स्वत: काल तिथे भेट देऊन त्यांची तब्येतीची विचारणा केली. एखादा कार्यकर्ता समाजासाठी आपले जीव धोक्यात टाकून आंदोलन करत असेल तर सरकार म्हणून  त्यांची भूमिका ही दुटप्पी आणि दुजाभावाची नसावी. त्यासाठी मी काल  मुख्यमंत्र्यांना फोन करून याबाबत विचारणा केली. त्यानुसार आज सरकारचे एक शिष्टमंडळ  लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन यावर मार्ग काढतील, असा मला विश्वास आहे असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. ओबीसीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काल लक्ष्मण हाके यांची भेट  घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 


दोन समाजात वाद लावण्याचे पाप महायुतीने केलं


2010 नंतर बंगाल आणि बिहार येथे  आरक्षण रद्द करण्यात आलं. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देणं हे अपेक्षित आहे. मतांच्या लाचारीसाठी, आणि संविधानिक रित्या ते  आरक्षण कसे टिकेल आणि ते टिकावं यासाठी सरकार कुठलेही प्रयत्न न करताना दिसत आहे. केवळ मतांच्या लाचारीसाठी वाटेल त्याला आश्वासन देने आणि  वेळ मारून येणे एवढेच काम सध्याचे सरकार करत आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत मराठा विरुद्ध ओबीसी या दोन समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचे पाप महायुतीच्या सरकारने केलं. अशी बोचारी टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.  


2014 मध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर  समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू झाले. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये  जातीपातीत विभागून राज्याला कलंक लावण्याचे काम कोणी केला असेल तर ते महायुती सरकारने केला आहे. तसेच सध्या सुद्धा तेच चित्र बघायला मिळत आहे. जी गोष्ट होऊ शकत नाही तीच गोष्ट रेटून सांगायची आणि वेळ मारून न्यायाची. हेच काम सध्याचे सरकार करत आहे. मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा असेच आश्वासन देण्यात आले. त्यात अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. समाजात संभ्रम निर्माण करून लोकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याची टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


''13 तारखेला फसवलं की तुमचा कार्यक्रम केलाच समजा''; जरांगेंचा इशारा, वडेट्टीवारांच्या अश्रूंवरही बोलले