OBC Political Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धध ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी साडे तीन वाजता महत्त्वाची बैठक होणार आहे. परंतु, या बैठकीआधीच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. "ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येतो. ग्रामविकास मंत्र्यांनी ओबीसी वर्गाबाबत आम्हाला माहिती देणं अपेक्षित होतं अशी नाराजी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. 


विजय वडेट्टीवार म्हणाले, "ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित येतो. ओबीसींच्या विकासासाठी या खात्याचं काम आहे. ग्राम विकास खात्याअंतर्गत ओबीसी आरक्षणावर जी तयारी राज्यशासन करत आहे याबाबत माहिती दिली जात नाही, अशी नाराजी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.  


"ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे नाही. परंतु, ओबीसी नेते म्हणून आम्हाला प्रश्न विचारले जातात. मात्र, ओबीसी आरक्षणाबाबत कार्यवाही करताना आमच्या विभागाला विश्वासात घेतले जात नाही, अशी नाराजी विजय वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांच्या या नाराजीमुळे ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारच्या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची बाब समोर येत आहे. 


एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी तिन्ही पक्षांचे सरकार असूनही आमच्यात चांगला संमन्वय आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. एखाद्या प्रश्नावर आम्ही संवादातून मार्ग काढून पुढे जातो. त्यामुळेच ओबीसींच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आजची बैठक बोलवल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.  


महत्वाच्या बातम्या