मुंबई : राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या कोट्यावधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर (Dadar) स्थानकाचं नामांतर 'चैत्यभूमी’ (Chaityabhoomi) करावे आणि यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आज सभागृहात केली आहे.
राज्य सरकारने 2018 मध्ये एल्फिन्स्टन रोड स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी केलं. ओशिवारा येथे रेल्वे स्थानक बनत असतानाच त्याला राम मंदिर असं नाव दिलं. दरम्यान, दादर स्थानकाचं नाव बदलून त्याचे नाव चैत्यभूमी करावं, ही भीमसैनिकांची मागणी खूप जुनी आहे. त्यामुळे राज्य सरकारने जनभावनेचा आदर करत आता दादरचं नाव चैत्यभूमी करावं, अशी आग्रही मागणी डॉ. राऊत यांनी आज सभागृहात केलीय.
भीम अनुयायांच्या भावना लक्षात घेता नामंतरण करा- डॉ. नितीन राऊत
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात होत आहे. या आठवड्यात विधिमंडळात अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर केली जाणार आहेत. त्याचबरोबर मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकाच्या नामंतरणाबाबत करण्यात आलेल्या शासकिय ठरावही विधान परिषदेत ठेवला जाणार आहे. या ठरावात मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी देखील दादर स्थानकाचं नाव बदलून त्याचे नाव चैत्यभूमी करावं, ही आग्रही मागणी लावून धरली आहे.
राज्य सरकारने प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठपुरावा करा- डॉ. नितीन राऊत
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यात दादरला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दादरलाच राजगृहात ते राहायचे आणि महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचे अंतिम विधी देखील येथेच झालाय. त्यामुळे राज्यातल्याच नाही, तर देशातल्या आणि जगातल्या भीम अनुयायांच्या भावना दादरशी जोडल्या गेल्या आहेत. दरवर्षी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करत या अधिवेशनातच राज्य सरकारने असा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी यावेळी डॉ. राऊत यांनी राज्य शासनाला केलीय.
मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांची नावं बदलणार
करीरोड - लालबाग रेल्वे स्थानक
सॅन्डहर्स्ट रोड स्थानकाचे नाव बदलून डोंगरी रेल्वे स्थानक असे करण्याचा प्रस्ताव
पश्चिम मार्गावरील स्थानकं
मरीनलाईन रेल्वे स्थानक - मुंबादेवी रेल्वे स्थानक
चर्नीरोड रेल्वे स्थानक - गिरगांव रेल्वे स्थानक
हार्बर मार्गावरील स्थानकं
कॉटनग्रीन रेल्वे स्थानकाचे नाव - काळाचौकी रेल्वे स्थानक
डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचे - माझगांव रेल्वे स्थानक
किंग्जसर्कल रेल्वे स्थानकाचे - तीर्थकर पार्श्वनाथ स्थानक
इतर महत्त्वाच्या बातम्या