Dharashiv Political News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडी वेगानं घडत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे आज भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार  अर्चना पाटील यांच्या प्रचारसभेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुनिल चव्हाण हाती कमळ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थितीत राहणार आहेत. दरम्यान, माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा दिला आहे.

  


दोनच दिवसापुर्वी मधुकरराव चव्हाणांनी घेतली होती फडणवीसांची भेट 


दरम्यान, मागील दोनच दिवसापुर्वी मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी बसवराज पाटील हे देखील उपस्थित होते.  
दरम्यान मधुकर चव्हाण काँग्रेस पक्षात राहणार तर मुलगा सुनील भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 


सुनील चव्हाण यांनी दिला महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा 


माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहीत पदाचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा दिला राजीनामा आहे. सुनील चव्हाण हे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आजच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्यची माहिती मिळत आहे. सुनिल चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळं ते भाजपमध्ये प्रवेश करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा धाराशिव लोकसभा मतदारसंघात आहे. 


धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता


दरम्यान, सुनिल चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. कारण, त्यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा हा महायुतीच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी होणार आहे. त्यामुळं सुनिल चव्हाण यांचा भाजप प्रवेश महत्वाचा मानला जात आहे. हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय. दरम्यान, सुनिल चव्हाण यांच्या भाजपमधील प्रवेशानं धाराशिव जिल्ह्यात भाजपची ताकज वाढवण्यास मदत होणार आहे. सुनिल चव्हाण यांचे वडील मधुकरराव चव्हाण राजकाराणातील एक अनुभवी व्यक्तीमत्व आहे. मधुकर चव्हाण यांनी मात्र, सध्या कोणताही निर्णय घेतला नाही. ते काँग्रेसमध्येच राहण्याची शक्यता आहे.