Harshvardhan Sapkal : मराठी शाळा संपवण्याचा सरकारचा घाट असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केली आहे. शिक्षण महाग होत चाललं आहे. माय बोलीत शिक्षण बंद करण्याचा घाट आहे. केंद्र सरकर क्रूर आहे याचे हे उदाहरण असल्याचे सपकाळ म्हणाले. मराठी भाषेला अभिजात दर्जा देतात आणि आता भाषा चिरडून टाकणे सुरु असल्याचे ते म्हणाले.
संविधान विविधेतेचे वैशिष्ट आहे. प्रादेशिक भाषेचा सन्मान राखला गेला पाहिजे. दक्षिणेतील राज्यांचा हिंदी भाषेवर वेगळा दृष्टिकोन आहे. मराठी भाषा आमच्यासाठी अस्मिता आहे. भाषेत घोळ घालण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे सपकाळ म्हणाले. भाजपला प्रादेशिक भाषा संपवून राज्य करायचे आहे. भाषावार बुलडोझर चालवण्याचे काम सुरू आहे. या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे सपकाळ म्हणाले. सरकारे हा निर्णय मागे घ्यावा अशी आमची मागणी आहे.
हर घर नल हर घर जल 2024 कुठे गेलं?
पाणी भरण्यासाठी मुलगी गेली आणि तिचा मृत्यू झाला. या सरकारचं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. हर घर नल हर घर जल 2024 कुठे गेलं? असा सवाल सपकाळ यांनी केला. नळ नाही पाणी नाही उलट लोकांचे बळी जात आहेत, हा मोदी सरकारचा नाकारर्तेपणा असल्याचे सपकाळ म्हणाले. काका खोक्या या टोळ्या गॅंग अशी नाव महाराष्ट्राला मिळालेले आहेत. तरीदेखील त्या ठिकाणचा अत्याचार थांबलेला नाही रिंगण करुन मारणे. एवढा मोठा पूर्व प्रकार हा बीडमध्ये पाहायला मिळाला आहे. महिला वकील सोबत झालेला आहे. आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी शरम बाळगावी अशी टीका सपकाळ यांनी केली. या आधी आम्ही राजीनामा मागितला मात्र ते राजीनामा देत नाहीत. या आधी मागणी केली होती की पूर्ण वेळ गृहमंत्री करा. महाराष्ट्राचा कारभार घाशीराम कोतवाल चालवत आहेत का? हा प्रश्न पुन्हा नव्याने सर्वांसमोर आलेला आहे असे सपकाळ म्हणाले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल. ही अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होईल. जूनपासून या धोरणाची अंमलबजावणी होईल. त्यानुसार राज्यात इयत्ता पहिलीपासून हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याविरोधात विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: