कोल्हापूर : काँग्रेसचे नेते आणि सांगली सातारा विधानपरिषद मतदारसंघाचे आमदार मोहनराव कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहनराव कदम हे पतंगराव कदम यांचे बंधू आहेत. आमदार मोहनराव कदम यांच्यासह त्यांच्या पत्नी, पुत्र शांताराम कदम व नातू यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार मोहनराव कदम यांचे सुपुत्र व भारती हॉस्पिटल सांगलीचे मानद संचालक डॉ. हणमंतराव कदम व नातू डॉ.जितेश कदम तसेच डॉ.जितेश भैय्या यांच्या मातोश्री यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समजले. त्यानंतर आज 15 ऑगस्ट रोजी आमदार मोहनराव कदम यांचेसह कुटुंबातील चौघांचा कोरोनाची चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आमदार मोहनराव कदम यांचे वाहन चालक, शांताराम कदम यांचे स्वीय सहाय्यक तसेच या कुटुंबियांच्या संपर्कातील एक तरुण असे एकंदरीत सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान आमदार मोहनराव कदम यांची प्रकृती ठणठणीत आहे. सर्व कुटुंबियांची व संपर्कात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृतीही ठणठणीत आहे असे शांताराम कदम यांनी सांगितले. नुकतेच माजी मंत्री सुरेश खाडे, युवा नेते जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम यांना यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात येत आहे.
कोरोनाने राज्यासह देशभरात धुमाकूळ घातला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, गृहमंत्री अमित शहा यांच्यापासून ते राज्यातील विविध मंत्री, आमदार, खासदार, महापौर यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता सांगलीत देखील कोरोनाचा विळखा आणखीन घट होताना दिसत आहे. नुकतेच माजी मंत्री आणि मिरज मतदार संघाचे आमदार सुरेश खाडे तसेच युवा नेते जितेश कदम यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव आमदार मोहनराव कदम यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.