मुंबई/सातारा : उदयनराजे भोसले यांनी साताऱ्याच्या खासदारकीचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आता साताऱ्याची पोटनिवडणूक महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी (21 ऑक्टोबर) होणार आहे. उदयनराजे भाजपच्या तिकीटावर ही निवडणूक लढणार आहेत. तर उदयनराजेंविरोधात आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्याची पोटनिवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

साताऱ्याची जागा आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, मात्र काँग्रेससाठी राष्ट्रवादी ही जागा सोडण्यास तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ही पोटनिवडणूकक लढण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळाली आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना तातडीने दिल्लीत सोनिया गांधींकडून बोलावणं आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच, याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात पुन्हा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं या दोघांपैकी एक जण उदयनराजेंच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ पाहा : उदयनराजेंना अश्रू अनावर



साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पदाचा राजीनामा देत अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीत भाजपअध्यक्ष अमित शाह, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि रावसाहेब दानवे उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या मार्गावर भाजप वाटचाल करत असल्याचं सांगत उदयनराजे भाजपवासी झाले. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशानंतर साताऱ्यात त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला. उदयनराजेंनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

शरद पवारांच्या आठवणींनी उदयनराजे गहिवरले | सातारा | ABP Majha



दरम्यान, भाजप प्रवेशानंतर पक्षप्रवेशानंतर उदयनराजे म्हणाले की, लोकांच्या हितासाठी मी हा भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. पूर्णपणे निस्वार्थी भावनेने मी हे पाऊल उचलले आहे. मोदी-शाह देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत, त्याचबरोबर त्यांनी लोकशाही मजबूत केली आहे. कलम 370 रद्द करण्याचा निर्णयदेखील याच सरकारने घेतला. त्यामुळे मी भारावून गेलो आहे.

...तर मी साताऱ्याची पोटनिवडणूक लढवणार नाही : उदयनराजे भोसले

सत्तेत असताना मी कुठली फाईल घेऊन गेलो तर फाईल डस्टबिनमध्ये जायची : उदयनराजे

'मला संपर्क करू नका, मी जातोय' : उदयनराजे

शरद पवारांचा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना टोला | सातारा | ABP Majha