मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला एक वर्ष आणि सात महिने झाले त्याच्या आतच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चांना उधाण आले होते. मात्र महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट करत चर्चांना पूर्णविराम लावला आहे. एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. 


विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवायची का? हा निर्णय हायकामंड घेणार आहे. निवडणुकीला वेळ असून आता हा विषयच नाही असे म्हणत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याला कॉंग्रेस प्रभारी एच के पाटील यांनी छेद दिला आहे. एच के पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळे या विषयी निर्णय योग्य वेळी घेण्यात येणार आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे यबाबत आता बोलणे योग्य नाही. त्यामुळे  हा प्रश्नच उपस्थित होत नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. विधानसभा निवडणुकीबाबत सध्या कोणतीही चर्चा नाही. 2023 मध्ये यासंदर्भात  चर्चा करण्याक येईल.  


 2023 च्या निवडणुकीत आम्ही एकटे लढू की आघडी होईल हा निर्णय हायकामंड घेईल. ही वेळ हा निर्णय घ्यायचा नाही. कॉंग्रेस आपला निर्णय 2023 च्या शेवटी होईल अजून त्याचा प्रस्ताव नाही. याबाबत आता विचार करायची वेळ नाही आणि हा निर्णय हायकामंड घेईल असेही पाटील या वेळी म्हणाले, 


आगामी निवडणुकीत नाना पटोले यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहिले जाते या बद्दल बोलताना पाटील म्हणाले की, हा प्रश्नच उद्भवत नाही. निवडणूक  व्हायला अजून वेळ आहे. निवडणूक येतील तेव्हा निर्णय होईल हे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. या  प्रश्नांवर बोलणे आता योग्य नाही.  काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांच्याकडून भाई जगताप यांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित झाले. याबद्दल पाटील म्हणाले, हा पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. छोटा मुद्दा आहे चर्चा करून सोडवण्यात येईल. 


कॉंग्रेस नाराज नाही महाविकास अघडी सरकार चांगलं काम करत आहे. मुख्यमंत्री चांगलं काम करत आहे. आरक्षण विषयाबाबत सरकार काम करत आहे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसने जे विषय मांडले होते ते सोडवले जातील विश्वास आहे. विधानसभा अध्यक्ष पद रिक्त आहे ते भरले पाहिजे
निवडणूक लागली की उमेदवार ठरवण्यात येतील, असे पाटील म्हणाले.