मुंबई : काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि सामान्य जनतेला सरकारशी सुसंवाद साधता यावा या हेतूने काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांना विविध जिल्ह्यांच्या संपर्क मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात आपल्या पक्षाचा विस्तार आणि वर्चस्व रहावं म्हणून काँग्रेसने आज संपर्कमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात काँग्रेसचा पालकमंत्री नाही अशा जिल्ह्यांसाठी काँग्रेसने संपर्कमंत्री दिले आहेत.


महाराष्ट्र विकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला 10 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. मात्र उर्वरित जिल्ह्यात शिवसेना किंवा राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. अशा जिल्ह्यांसाठी काँग्रेसने हे संपर्कमंत्री नियुक्त केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार सत्तेवर असतानाही दोन्ही पक्षांनी अशा पद्धतीने संपर्कमंत्री नियुक्त केले होते. सध्या तरी काँग्रेसकडूनच संपर्कमंत्री नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये पालकमंत्री त्यांना अधिकची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.


कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे अहमदनगर ,नाशिक जिल्हा संपर्क मंत्र्याची जबाबदारी देण्यात आली आहे. अशोक चव्हाण - परभणी, बीड, जालना या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

संपर्क मंत्री 

नितीन राऊत - अकोला, वाशीम
विजय वडदेतीवर - गडचिरोली, यवतमाळ
यशोमती ठाकूर - बुलढाणा, गोंदिया
अमित देशमुख - औरंगाबाद, उस्मानाबाद
वर्षा गायकवाड - मुंबई उपनगर
सुनील केदार - पुणे
अस्लम शेख - ठाणे
के सी पाडवी - धुळे, जळगाव, पालघर
सतेज पाटील - सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी
विश्वजित कदम - सांगली, सोलापूर

Free Electricity | 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याच्या निर्णयावर पवार-राऊत यांच्यात एकवाक्यता नाही