नवी दिल्ली : भाजपने राज्यसभेसाठी 18 उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर काँग्रेसनेही एकूण 10 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. राज्यातून ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि विचारवंत कुमार केतकर यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.



काँग्रेसने सात राज्यातील दहा उमेदवारांची यादी जाहीर केली. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची उमेदवारांची यादी जाहीर केली.

भाजपचे राज्यातून तीन नावं जाहीर

राज्यसभेसाठी भाजपने एकूण 18 उमेदवारांची यादी जाहीर केली. यापैकी महाराष्ट्रातून तीन नावं आहेत. नारायण राणे आणि केरळमधील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या कोट्यातून यावेळी प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन राज्यसभेवर जातील.

राज्यसभेच्या एकूण 58 जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. त्यातील 6 जागा महाराष्ट्रातून आहेत. विधानसभेचं संख्याबळ पाहता, एका जागेवर काँग्रेसचा विजय निश्चित मानला जातो. त्यामुळे या तीन जागांवर महाराष्ट्रातून काँग्रेस कुणाला राज्यसभेवर पाठवतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार

वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी

डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी

रजनी पाटील  - काँग्रेस

अनिल देसाई  - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार निवृत्त?

भाजप -17

काँग्रेस - 12

समाजवादी पक्ष - 6

जदयू - 3

तृणमूल कॉंग्रेस - 3

तेलुगू देसम पक्ष - 2

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2

बीजद - 2

बसप - 1

शिवसेना - 1

माकप - 1

अपक्ष  - 1

राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3

बिहार - 6

छत्तीसगड - 1

गुजरात - 4

हरियाणा - 1

हिमाचल प्रदेश - 1

कर्नाटक - 4

मध्य प्रदेश - 5

महाराष्ट्र - 6

तेलंगणा - 3

उत्तर प्रदेश - 10

उत्तराखंड - 1

पश्चिम बंगाल - 5

ओदिशा - 3

राजस्थान - 3

झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

संबंधित बातमी :

राज्यसभेच्या 58 जागांसाठी 23 मार्चला निवडणूक