मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यानंतर आता काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
सुजय विखे पाटील यांच्यासाठी काँग्रेसने अहमदनगरची जागा मागितली. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे पुणे आणि उत्तर-मध्य मुंबईची जागा मागितली, त्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीकडून अहमदनगरच्या जागेची मागणी केल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने 50-50 टक्के जागावाटपाची मागणी केली.
भाजपकडून दिलीप गांधी सध्या अहमदनगरच्या खासदारपदी आहेत. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव रावळे यांचा दोन लाख 9 हजार 122 मताधिक्यांनी पराभव केला होता. बॉलिवूड अभिनेत्री दीपाली सय्यद यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला होता.
मुंबईतील आणखी एका जागेची मागणी यावेळी राष्ट्रवादीने केली. काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांची उत्तर मध्य मुंबईची जागा राष्ट्रवादीने मागितल्याची माहिती आहे. याबाबत अंतिम निर्णय काय होतो, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जागावाटपांबाबत बैठक झाली. विखे-पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी काल (शनिवारी) रात्री उशिरापर्यंत ही बैठक चालली. जागावाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
या बैठकीला अशोक चव्हाणांसोबत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, माणिकराव ठाकरे यासारखे दिग्गज नेते उपस्थित होते, तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ हजर होते.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुजय विखे पाटलांसाठी काँग्रेसकडून नगरच्या जागेची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
21 Oct 2018 09:12 AM (IST)
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -