Bharat Jodo Yatra : राज्यात तिसऱ्या दिवशीही भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही यात्रा कृष्नूर ते नांदेड मार्गक्रमण करत असताना बुधवारी राहुल गांधी यांनी शेतकरी, शेतमजूर, बचत गटांच्या महिला, विद्यार्थी यांची भेट घेऊन बातचीत केलीय. दरम्यान या सर्व यात्रेत कुटुंबासह सामील झालेले कोळी बांधवांचे कुटुंब लक्ष वेधून घेत होते. मुंबईहून भारत जोडो यात्रेत दाखल झालेले कोळी बांधवांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपल्या समस्या सांगतल्या. दरम्यान, आज या यात्रेचा चौथा दिवस आहे. राज्यातील भारत जोडो यात्रेच्या चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी होऊ शकतात. अशातच चौथ्या दिवशी कसा असेल या यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम हे जाणून घेऊ.
राहुल गांधींनी सुरू केलेल्या पदयात्रेचा आज 64 वा आणि महाराष्ट्रातला आज चौथा दिवस आहे.
सकाळी 6 वाजल्यापासून राहुल गांधी पदयात्रेला नांदेडच्या लोहा येथून सुरूवात करतील.
दुपारी 4 वाजता देगलुर नाका येथून पुन्हा पदयात्रेला सुरूवात होईल.
संध्याकाळी 6 वाजता न्यु मुंडा मैदान येथे राहुल गांधीची सभा होणार आहे.
आज जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार आज यात्रेत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर मधून 7 नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू झाली. बुधवारी बिलोली तालुक्यातील कृष्नूर या ठिकाणा वरून सकाळी 6:00 वाजता ही यात्रा पादाक्रांत झालीय.दरम्यान महाराष्ट्रात जेंव्हा पासून राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेत सुरू झालीय तेव्हापासून भारत जोडोपेक्षा जास्त चर्चा ही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारस कोण? याची जास्त चर्चा होताना दिसत आहे. कारण भारत जोडो यात्रेतील काँग्रेसच्या जेष्ठ राजकीय नेत्या सोबत अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे झळकलेले बॅनर आणि देगलूर पासून राहुल गांधी यांच्या सोबत या पदयात्रेत अशोक चव्हाण यांच्यापेक्षा जास्त खांद्याला खांदा लावून मार्गक्रमण करत असलेल्या सुजया.
दरम्यान आज तिसऱ्या दुवशी सकाळीही सुजया या तेवढ्याच जोशाने आणि त्वेषाने राहुल गांधी यांच्या सोबत भारत जोडो यात्रेत पादाक्रांत करताना दिसल्या. त्यामुळे आज नांदेड येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभेत सुजया यांची राजकीय भूमिका व आगमन स्पष्ट होईल याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे येत्या काळात एका मोठ्या राजकीय घराण्यातील व देशाचे माजी गृहमंत्री, जलनायक शंकरराव चव्हाण यांची नात ही उद्याची माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राजकीय वारस असेन हे, मात्र निश्चित आहे.