Congress Azadi Gaurav Padayatra : काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा; कार्यकर्त्यांसह महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी

Congress Azadi Gaurav Padayatra : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्यांना वंदन करण्यासाठी काँग्रेसतर्फे पदयात्रेला सुरूवात झाली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Aug 2022 12:01 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात शिरोड्यातुन काँग्रेसतर्फे आझादी गौरव पदयात्रा सुरू

Sindhudurg : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय काँग्रेसने संपूर्ण देशात आजादी गौरव पदयात्रा प्रत्येक जिल्ह्यात काढली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पदयात्रेची सुरवात वेंगुर्ले मधील शिरोडा गावातील मिठागर येथून होत आहे. महात्मा गांधीनी केलेला मिठाचा ऐतिहासिक सत्याग्रह शिरोडा या गावी झाला होता, त्याठिकाणी सुरवात करण्यात आली. देशभक्तीच्या जोशपूर्ण वातावरणात या पदयात्रेची सुरवात झाली. या पदयात्रेत सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख सह पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

पार्श्वभूमी

Congress Azadi Gaurav Padayatra : काँग्रेस कमिटीतर्फे आझादी का गौरव अंतर्गत पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. आज राज्यातील विविध शहरातून काँग्रेस पदाधिकार्‍यांनी पदयात्रा काढली आहे. यात महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.



 






 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.