पंढरपूर : पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी शिवीगाळ करणाऱ्या भाजपच्या शहराध्यक्षा विरोधात मंदिर समितीच्या कर्मचाऱ्याने पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संजय वाईकर असे या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आहे. आज दुपारी विठ्ठल मंदिरात भाजप शहराध्यक्ष संजय वाईकर पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना दर्शन देण्यासाठी आले होते.
सध्या दिवाळी सुट्ट्यामुळे दर्शनासाठी तोबा गर्दी असल्याने दर्शनाची रांग सारडा भवन पर्यंत पोचलेली होती. यामुळे मंदिराचे कार्यकारी अधिकाऱ्यांनी दर्शन रांगेतील सर्वसामान्य पर्यटकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी घुसखोरी करून झटपट दर्शन घेणाऱ्या सर्वच VIP दर्शन बंद ठेवण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले होते. यातच हे भाजप पदाधिकारी दर्शनाला आल्यावर त्यांनी थोडावेळ थांबण्यास सांगताच बाचाबाचीला सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या भाजप अध्यक्षांनी थेट प्रांताधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरच्या पट्टीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
उपस्थितांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने मस्तीत शिवीगाळ सुरूच ठेवली. प्रांताधिकाऱ्यांनी आपण यावर मुख्यमंत्र्यांना तक्रार करू असे सांगताच खुशाल करा अशी उर्मट भाषा वाईकर याने वापरली. उर्मट भाषा या भाजप पदाधिकाऱ्याने सर्व कर्मचारी आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांसमोर शिवीगाळ केल्यावर सहनशीलपणे सर्व ऐकून घेणाऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याने उठून जाणे पसंत केले. यानंतर संतप्त झालेल्या विनोद वाघमारे या मंदिर कर्मचाऱ्याने वाईकर याच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी शिवीगाळ, भाजप शहराध्यक्षावर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Nov 2018 09:07 PM (IST)
भाजप पदाधिकारी दर्शनाला आल्यावर त्यांनी थोडावेळ थांबण्यास सांगताच बाचाबाचीला सुरुवात केली. यावेळी संतापलेल्या भाजप अध्यक्षांनी थेट प्रांताधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरच्या पट्टीत बोलण्यास सुरुवात केली. त्यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना जातीवाचक शिवीगाळ केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -