सातारा: महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय प्रियांका मोहिते या तरुणीनं किमया करत साऱ्या जगात नावलौकिक मिळवला आहे. साताऱ्याच्या या लेकिनं जगातील दहाव्या क्रमांकाच्या पण तितक्याच खडतर चढाई असणाऱ्या अन्नपूर्णा या पर्वतशिखरावर तिरंगा फडकवला आहे. ही किमया करणारी प्रियंका पहिली भारतीय महिला ठरली आहे. प्रियंकाहून वरिष्ठ पदावर कार्यरत असणआऱ्या आणि बायोक़ॉन लिमिटेडच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या किरण मजूमदार शॉ़ यांनी याबाबतची माहिती दिली.
ट्विट करत किरण यांनी लिहिलं, 'आपली सहकारी प्रियांका मोहिते हिनं 16 एप्रिल 2021 ला दुपारी, 1.30 वाजता अन्नपूर्णा पर्वतावर यशस्वी चढाई केली. असं करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे'. या ट्विटसोबतच त्यांनी प्रियंकाचा एक फोटोही जोडला. या फोटोमध्ये प्रियंका पर्वतशिखरावर तिरंगा मोठ्या अभिमानानं फडकवताना दिसत आहे.
माऊंट अन्नपूर्णा हे पर्वत हिमालयाचा एक भाग असून ते नेपाळमध्ये स्थित आहे. समुद्रसपाटीपासून याची उंची 8 हजार फुटांपेक्षाही जास्त आहे. यापूर्वी प्रियंकाने 2013 मध्ये जगातील सर्वाधिक उंचीच्या समजल्या जाणाऱ्या, समुद्रसपाटीपासून 8,849 मीटर इतक्या उंचीवर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्ट पर्वताची चढाई केली होती. तर, 2016 मध्ये माऊंट किलिमंजारो आणि 2018 मध्ये माउंट ल्होत्से, माउंट मकालूवरही चढाई केली होती. सध्या तिची ही एकंदर कामगिरीही अनेकांनाच कौतुकाची वाटत असून त्या सर्वांच्या प्रशंसेस पात्र ठरत.
पुण्यातल्या गिरीप्रेमींची 'अन्नपूर्णा-1' शिखरावर यशस्वी चढाई
गिरिप्रेमी या पुण्यातील अग्रणी गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भूषण हर्षे, डॉ. सुमित मांदळे व जितेंद्र गवारे यांनी जगातील दहावे उंच शिखर माऊंट अन्नपूर्णा-1 (8091 मीटर्स उंच) वर यशस्वी चढाई केली.
ज्येष्ठ गिर्यारोहक आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांच्यानेतृत्वाखाली पार पडलेली ही गिरिप्रेमीची आठवी अष्टहजारी मोहीम असून अशी कामगिरी करणारी गिरिप्रेमी ही भारतातील पहिली नागरी गिर्यारोहण संस्था आहे.