Mahaashtra Weather Update: देशात उत्तरेतून येणाऱ्या शीत लहरी आता आणखी तीव्र झाल्या आहेत. जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील बहुतांश राज्यांमध्ये शुन्याखाली तापमान गेलं आहे. भारतीय हवामान विभागानं मध्य महाराष्ट्रासह विदर्भ,मराठवाड्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा (Cold Wave Alert) दिला आहे. येत्या 24 तासांत राज्यात 3 ते 5 अंशांनी तापमान घटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, सध्या बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी कमी दाबाचा पट्टा आहे. दरम्यान, अरबी समुद्राला जोडून असणाऱ्या भागात चक्राकार वारे असल्याने दक्षिणेत अजूनही  पावसाची शक्यता आहे. तर उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता वाढल्याने उत्तर व मध्य भारतात गारठा वाढणार असून थंडीची लाट पसरणार आहे.


येत्या 24 तासांत हुडहुडी


गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी नागरिक गारठले आहेत.तापमानाचा पारा दिवसेंदिवस एक ते दोन अंशानी घटत असून शेकोट्यांची ऊब घेत नागरिक बोचऱ्या थंडीला पळवून लावतायत.दरम्यान, सोमवारी राज्यात विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा कडाक्याच्या थंडीचा होता. परभणीत 4.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर नाशिकच्या ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सियसवर पोहोचलं होतं. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या 24 तासांत राज्यातील तापमान 3-5 अंशांनी घटणार असून  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 16 ते 22 डिसेंबरदरम्यान थंडीची लाट राहणार आहे. दरम्यान, पुण्यात आणखी एक दिवस थंडीचा जाणार असल्याचं पुणे IMD प्रमुख के एस होसाळीकर यांनी x माध्यमावर पुण्यातल्या तापमानावर पोस्ट केली आहे.


 






थंडीची लाट कुठे आणि कधीपासून?


हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, उत्तरेकडील राज्यांनंतर आता राज्यातही काही भागात थंडीच्या लाटेला सुरुवात होणार आहे.  विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 16  व 22 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट असून पहाटे दाट धुक्याची चादर, तापमान निचांकी राहण्याची शक्यता आहे. राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय. बोचऱ्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र गारठलाय. ठिकठिकाणी शेकोटीच्या उबेला नागरिक बसल्याचं चित्र दिसत असून दुपारपर्यंत गारठा कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलय. विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरले आहे.


हेही वाचा :


Temperature Alert: बोचऱ्या थंडीनं हातपाय सुन्न, ओझरमध्ये 3.8, परभणीत 4.1अंश! पहा कुठे काय तापमान?