मुंबई : पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातही वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा स्कायमेटनं दिला आहे.
पुण्यातील भोरमध्ये गेल्या तासाभरापासून पाऊस पडतो आहे. वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले आहेत.
सांगलीत ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली आहे. काही तासांपूर्वी स्कायमेटनं पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली होती.
कोकणातही काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. चिपळूणच्या ग्रामीण भागात पावसाच्या सरी सुरुवात झाल्या आहेत.
दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपिटीसह गडगडाटी वादळ होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे.