नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चुलत भाऊ संजय फडणवीस यांनी नागपुरातील अॅड अभियान बारहाते यांना फोनवर धमकावलं, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी अर्ज भरताना 22 राजकीय गुन्हे असल्याचं नमूद केलं होतं. त्यावेळी त्यांनी दोन गुन्ह्यांची माहिती निवडणूक अर्जात लपवली होती. त्याच दोन गुन्ह्यांसंदर्भात आवाज उठवणाऱ्या सतीश ऊके यांचे वकील अॅड अभियान बारहाते यांना संजय फडणवीस यांनी धमकावल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात जे दोन गुन्हे लपवले होते, त्याबाबत अॅड सतीश ऊके यांनी निवडणूक अधिकारी, न्यायालय अशा विविध पातळ्यांवर आवाज उचलला. मात्र, त्यांना यश आलं नाही. आता अॅड अभियान बारहाते यांनी सतीश ऊके यांच्यावतीने न्यायालयात एक याचिका दाखल करताच, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने धमकावले, असं नाना पटोले म्हणाले.
संजय फडणवीस यांनी दिलेल्या धमकीची ऑडिओ क्लिपिंग ही नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत वाजवली. संजय फडणवीस यांच्याविरोधात अॅड अभियान बारहाते यांनी अजनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी संजय फडणवीसांवर गुन्हा दाखल करावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी ही नाना पटोले यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने वकिलाला फोनवरुन धमकावलं : पटोले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2018 02:35 PM (IST)
आता अॅड अभियान बारहाते यांनी सतीश ऊके यांच्यावतीने न्यायालयात एक याचिका दाखल करताच, त्यांना मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाने धमकावले, असं नाना पटोले म्हणाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -