मुंबई : राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकर्सची झाडाझडती घेतली. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. या बैठकीला कृषीमंत्री चंद्रकांत पाटील आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
गेल्या वर्षीच्या तुलनेत बँकांनी यंदा केवळ 54 टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच पुढील वर्षात पीककर्ज वाटपात उद्दीष्ट न गाठल्यास बँकांवर दंडात्मक कारवाई करु, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
यंदा राज्याच्या 4 लाख 24 हजार 39 कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. 2019 - 20 या वर्षासाठी 59 हजार 766 कोटींचे उद्दीष्ट बँकांना देण्यात आले आहे. यात खरीपासाठी 43 हजार 844 कोटी आणि रब्बी हंगामासाठी 15 हजार 921 कोटींचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.
2019-20 साठीचे पीककर्ज वाटप उद्दीष्ट - एकूण 59 हजार 766 कोटी
खरीप हंगाम - 43 हजार 844 कोटी
रब्बी हंगाम - 15 हजार 921 कोटी
मागील वर्षीचे उद्दीष्ट - 58 हजार 331 कोटी
मागली वर्षी साध्य केलेले उद्दीष्ट - 31 हजार 282 कोटी (54%)
शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्याने मुख्यमंत्र्यांचा बँकांना कारवाईचा इशारा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2019 07:33 PM (IST)
राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकर्सची झाडाझडती घेतली. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी बँकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
फोटो : गेट्टी इमेज
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -