CM Uddhav Thackeray LIVE : मराठा आरक्षणाबाबत जास्त वेळ न घालवता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, उद्या केंद्राला पत्र लिहिणार - मुख्यमंत्री
CM Uddhav Thackeray :आज रात्री 8.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करत आहेत. आज झालेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर काय बोलणार? याकडे लक्ष लागून आहे.
मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली तीच पुढेही दाखवावी, सरकारवर विश्वास ठेवावा, ही लढाई सरकार जिंकून दाखवेल, तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही- मुख्यमंत्री
छत्रपती संभाजी राजे यांनी अत्यंत सावध भूमिका घेतली- मुख्यमंत्री
मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे मराठा आरक्षणाचा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडुन धन्यवाद! - मुख्यमंत्री
1800 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्यातच करणार. तिसर्या लाटेला तोंड देण्याची तयारी महाराष्ट्रात सुरु- मुख्यमंत्री
दुसरी लाट थोपवायची आहेच परंतु तिसर्या लाटेचा घातक परिणाम राज्यावर होऊ द्यायचा नाही, याचा चंग बांधुन राज्य काम करत आहे- मुख्यमंत्री
25 एप्रिलला राज्यात जवळपास सात लाखाला पोहचलो होतो आणि 4 मे म्हणजे काल 6,41000 इतकी आपण रुग्णवाढ थोपवली आहे. काही जिल्ह्यात मात्र रुग्णवाढ होत आहे, आपण लक्ष ठेवुन आहोत : मुख्यमंत्री
कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचं सुप्रीम कोर्टाने कौतुक केलंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र अजुनही धोक्याच्या वळणावर! जे जे करण्याची गरज आहे ते ते करण्याचा प्रयत्न सुरु - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पार्श्वभूमी
निवेदनात असंही म्हटलंय की, आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्याला नसून तो केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनाच अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगितलं गेलंय. हे एक प्रकारचं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला मार्गदर्शनच झालं. आता मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनीच घ्यावा ही आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. त्या आाधी शहाबानो प्रकरण, ॲट्रोसिटी कायद्यासंदर्भात तसेच 370 कलम काढण्यासंदर्भात, केंद्राने तत्पर निर्णय घेऊन न्यायप्रियता दाखवली आहेच. यासाठी घटनेतही बदल केले आहेत. आता तीच गती मराठा आरक्षणाबाबत दाखवावी.
छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही ? मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मा. पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न विचारला असल्याचंही या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वतीनं जारी केलेल्या या निवेदनात शेवटी म्हटलंय की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करता येणार नाही. पण यानिमित्ताने कुणी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करु नयेत. जनतेने उगाच डोकी भडकवून घेवू नये. मराठा आरक्षणाबाबत कायद्याची लढाई विजय मिळेपर्यंत सुरुच राहील.
महत्वाच्या बातम्या:
- Maratha Reservation: सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार सर्वतोपरीनं करणार- अजित पवार
- Maratha Reservation Verdict : मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Maratha Reservation Verdict : मराठा आरक्षण कायदा रद्द, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील पाच प्रमुख मुद्दे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -