मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या पावलावर पाऊल टाकल्याचं दिसत आहे. ज्याप्रमाणे सुरेश प्रभू ट्विटरच्या माध्यमातून सामान्यांच्या अडचणी दूर करतात, त्याप्रमाणे मुख्यमंत्रीही ट्विटरवर तक्रारी ऐकून त्यावर कारवाई करताना दिसत आहेत.

 

हद्दीचं कारण देणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक


 

पाऊस सुरु असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेदरकारपणे शिवनेरी बस चालवणाऱ्या चालकाची तक्रार एका महिलेने ट्विटरवर केली. मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही ट्वीटमध्ये मेंशन केलं. या ट्वीटची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

 



"मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या एमएच 06S9485 या शिवनेरीचा चालक पाऊस असतानाही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेदरकारपणे बस चालवत आहे," अशी तक्रार उषा प्रताप या महिलेने केली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच माफी मागितली. तसंच चौकशी करुन बसचा चालक संदीप याच्यावर कारवाई करण्यात येईल, असं सांगत बस 8.45 वाजता सुरक्षित पोहोचल्याचं नमूद केलं.

https://twitter.com/upratap09/status/749597476366249985

 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/749629659814371329

 

ठाणे पोलिसांना मुख्यमंत्र्याची ट्विटरवरुन चपराक

 



दोनच दिवसांपूर्वी वाहतूक कोंडीची तक्रार करणाऱ्या नागरिकाला ठाणे शहर पोलिसांनी ट्विटरवरुन असमाधानकारक उत्तर दिलं होतं. त्यानंतर ठाणे शहर पोलिसांचं हे उत्तर मुख्यमंत्र्यांनी वाचलं आणि ठाणे पोलिसांना विनम्रता तसंच उत्तर देण्याची पद्धत योग्य शब्दात शिकवली. उत्तर सांगण्याची ही पद्धत योग्य नसल्याचे सांगत, उत्तर कसं असायला हवं, हेही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे शहर पोलिसांना सांगून चांगलीच चपराक दिली आहे.