महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांची आज (सोमवार) संध्याकाळी 6 वाजता भेट घेतली. दोघांमध्येही याबाबतच चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अमित शाहांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते.
मोदींसोबत होणाऱ्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरण्याची शक्यता आहे. कुणाची गच्छंती होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याचा निर्णय 28 नोव्हेंबरच्या बैठकीत होऊ शकतो. गुजरात निवडणुकीनंतर ही बैठक ठरवण्यात आली आहे.
दरम्यान या बैठकीत केवळ गुजरात निवडणुकीवरच चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यातील कार्यकर्त्यांच्या भावना अमित शाहांपर्यंत पोहोचवल्या. गुजरातमध्ये प्रचारासाठी येणार आहे, असं त्यांनी बैठकीनंतर सांगितलं.