Prasad Oak house :  विविधांगी भूमिका साकरणारा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याच्या नव्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली आहे. प्रसाद ओक याने इन्स्टाग्राम पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरी आल्याची माहिती दिली. प्रसाद ओक यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरुन कौतुक केलेय. 


 2024 नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसाद ओक नव्या घरात शिफ्ट झाला होता. त्याने एक व्हिडीओ पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसाद ओकच्या या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी हजेरी लावली होती. प्रसाद ओक याने याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. प्रसादने त्याच्या सोशल मीडियावरुन एकनाथ शिंदेंबरोबरचे काही फोटो पोस्ट केले होते. त्याशिवाय एकनाथ शिंदेंसाठी खास पोस्टही लिहिली आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं, असे ओक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय.


prasad oak instagram post  प्रसाद ओक यांची इन्स्टाग्राम पोस्ट - 


माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून…तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तू शांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात.. नीट निरखून आख्खं घर पाहिलंत.. हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीनी “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!!


साहेब…मनःपुर्वक आभार…!!!


ओक कुटुंबीय.






प्रसादचे आगामी चित्रपट (Prasad Oak Upcoming Movies)


प्रसादच्या गेल्या वर्षी रिलीज झालेल्या धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.'धर्मवीर 2 - मुक्काम पोस्ट ठाणे - भाग 2' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  धर्मवीर 2 - मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडेनं केलं आहे तर या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे.प्रसादच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. तसेच प्रसादचा  'महापरिनिर्वाण' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रसाद ओकसोबतच गौरव मोरे, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर,  प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.