जालना : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या आवाहनाला, दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या दाव्याला आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai)  यांच्या शक्यतेवर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. आतापर्यत सामंजस्याची भूमिका मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर घेतली होती, मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रमाणिकपणे छातीवर हात ठेवल्यास कळेल, त्यांचा सन्मान केल्यामुळे सात महिने वेळ दिला. मुख्यमंत्री अडचणीत येतील अस आमचं काही नाही, असे जरांगे म्हणाले. 


पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "ज्यांच्या 54 लाख नोंदी मिळल्यात, त्यांना आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र देण्यात यावेत. सगेसोयऱ्यांचा वटहुकूम काढावा. मुंबईला यायची आम्हाला हौस नाही, मुख्यमंत्र्यांनी देखील हे मनातून समजून घेतले पाहिजे. त्यांनी जनभावना समजून घेतल्या पाहिजेत. आम्ही मुंबईला का येत आहोत हे एकनाथ शिंदे समजून घेतलं पाहिजे, असे जरांगे म्हणाले. 


दीपक केसरकरांना उत्तर...


मनोज जरांगे यांची मूळ मागणी मान्य झाली असून, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, "आपण 54 लाख प्रमाणपत्र वाटले असतील तर त्याचा आम्हाला डाटा द्या, आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे सगेसोयरेचा वटहुकूम काढा. मग विचार करतो, असे जरांगे म्हणाले. 


शंभूराज देसाईंवर प्रतिक्रिया...


मनोज जरांगे यांनी थोडं सबुरीने घेतलं पाहिजे असे म्हणणाऱ्या शंभूराज देसाईंवर प्रतिक्रिया देतांना जरांगे म्हणाले की,“मुंबई आमची पण असून, आम्हाला वाटत नाही का, आम्ही तुमचा सन्मान राखून गावाकडे 7 महिने काढले. मला पण मर्यादा आहेत, मला समाज मोठा आहे. मी किती दिवस गावाकडे थांबणार, शंभूराज देसाई यांनी समजून घेतले पाहिजे, कोणत्या तोंडाने बोलायचे, असे जरांगे म्हणाले. 


अश्वासनावर हे आंदोलन थांबणार नाही


पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "आमचे दार उघडे आहे, तुम्हीच बंद केले म्हटलात. त्यामुळे बंद तर बंद, खरतर तुम्ही चर्चेसाठी तुटून पडले पाहिजे, पण त्यांनाच काही तोडगा काढायचा नाही असे दिसतेय. आरक्षणाचा मुद्दा एवढा चिल्लर नाही की, व्हाट्सअप- फेसबुक खेळायला. राज्यातील मोठ्या समुदायाचा मोठा प्रश्न आहे, बारीक लेकरा सारखं तुम्ही करू शकत नाहीत. सरकारच्या विनंतीला नेहमीच मान दिला, मी आढमूठा नाही. तर आता मुंबईकडे निघालो असून, अश्वासनावर हे आंदोलन थांबणार नाही, असे जरांगे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : मनोज जरांगेंची मूळची भूमिका मान्य झाली आहे; दीपक केसरकरांचं वक्तव्य