CM Eknath Shinde : पोलिसांना घरांची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबई, मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्रासह सर्वच भागातील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील, यासाठी तत्काळ आणि दीर्घ टप्प्याचे नियोजन करा. पोलिसांच्या घरांची परिस्थिती बदलून टाकण्याचा आमचा निर्धार आहे, असे एकनाथ शिंद म्हणाले.  पोलिसांकरिता घरे बांधताना ती अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सामुग्रीचा वापर करण्यात यावा, अशी सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


वारा, पाऊस, सण - उत्सव आणि कोरोना महामारीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत पोलीस आपल्यासाठी उभे असतात. त्यांना घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी विविध पर्याय आणि योजनांचा विचार करा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. म्हाडा, सिडको, एसआरए, क्लस्टर या योजनांसह सर्वसमावेशक घरकुल योजना, परवडणारी घरे तसेच एमएमआरडीए आणि खासगी विकासकांच्या माध्यमातून पोलिसांसाठी जास्तीत जास्त घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी आराखडा तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 


उद्धव ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच खतपाणी
गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लोणार सरोवराला भेट देत येथील विकास व संवर्धनासाठी 200 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरेंचा लोणार विकास हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आजच्या केबिनेटमध्ये मोठा निर्णय घेतला आहे.  लोणार संवर्धनासाठी उद्धव ठाकरेंपेक्षा 170 कोटी जास्त देत 370 कोटी रु देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या ड्रीम प्रोजेक्टला एकनाथ शिंदेंनी मोठं खतपाणी दिल्याचं बोलल्या जात आहे.