Prajakt Deshmukh : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुखला (Prajakt Deshmukh) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या 350 प्रयोगानिमित्त प्राजक्त नाशिकहून मुंबईत येत असताना खड्ड्यांमुळे त्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. ट्वीट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. 


मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांवर भाष्य करताना प्राजक्त म्हणाला की, खड्ड्यांमध्ये पाणी असल्यामुळे कोणत्या खड्ड्यात किती पाणी आहे याचा अंदाज येत नव्हता. खड्डे, ट्रफिक, आणि पाऊस अशी भीषण परिस्थिती होती. खड्ड्यांमुळे नाटकाच्या मध्यंतरादरम्यान मी नाट्यगृहात पोहोचलो. मी अभिनेता नसल्याने ते चालण्यासारखं होतं. पण अनेक कलाकार, नाटकाचा सेट ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी पोहचणं गरजेचं असतं. 






नाशिक-मुंबई महामार्ग नसून छळमार्ग


प्राजक्त म्हणाला,"काल-परवा बातमी ऐकली की, चार दिवसांसाठी टोल माफ केलेला आहे. पण आता मी आलो तर टोल माफ झालेला नाही. माझे पैसे कटच झालेत. चार दिवसांसाठी टोल माफ करून काय होणार? टोल भरून चांगले रस्ते मिळत नसतील तर मनस्ताप होतो. रस्ते तात्पुरते दुरुस्त केले जातात. मला माझी तक्रार नोंदवता येईल अशी एकही यंत्रणा नाही. पावसाळ्याआधी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. हा नाशिक-मुंबई महामार्ग नसून छळमार्ग आहे". 




प्राजक्त पुढे म्हणाला,"प्रवास करताना घरच्यांनादेखील काळजी वाटत राहते. बर-वाईट झाल्यावरच आपण शहाणे होणार आहोत का? मी गाडी चालवताना माझा शारिरीक आणि मानसिक छळ होत असतोच. पण घरच्यांनादेखील काळजी वाटत राहते. यावर योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे". 


संबंधित बातम्या


देव बाभळी नाटकाचा लेखक प्राजक्त देशमुख सांगणार पहिल्या नाटकाची गोष्ट; अखिल भारतीय युवा लेखक संमेलनात स्थान


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश