Shiv Sena Symbol Crisis : निवडणूक आयोगानं (Election Commission) शिवसेनेचं (Shiv Sena) पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवल्यानंतर दोन्ही गटांना नवीन पर्याय सादर करण्यासाठी आज दुपारी 1 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. अशातच शिंदे गट (CM Eknath Shinde) ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळत आहे. चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटानं (Uddhav Thackeray) ज्या चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्याच चिन्हांवर आता शिंदे गटानंही दावा केल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या तीन पर्यायांमध्ये ठाकरे गटाच्या यादीतील त्रिशुळ आणि उगवता सूर्य या दोन पर्यायांचा सामेवश असल्याची माहिती मिळत आहे. आता दोन्ही गटांकडून सारख्याच चिन्हांची मागणी केल्यामुळे ही दोन्ही चिन्हही आता निवडणूक आयोग बाद करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


ठाकरे गटाकडून चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय ठेवले आहेत. त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय असून उद्धव ठाकरेंकडून कालच्या संबोधनावेळी या चिन्हाचे फोटो दाखवण्यात आले. आता शिंदे गटानंही ठाकरे गटाच्या चिन्हांवर दावा केल्याची माहिती मिळत आहे. दोन्ही गटांनी सारख्याच चिन्हांचा दावा केल्यामुळं आता निवडणूक आयोग ही दोन्ही चिन्ह बाद करण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज दुपारी 1 वाजेपर्यंत दोन्ही गटांना आपले पर्याय सुचवण्याची मुदत आयोगाकडून देण्यात आली आहे. 


पाहा व्हिडीओ : ठाकरे गटाच्या चिन्हावर शिंदे गटाचाही दावा 



शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळं राज्याच्या राजकारणाचाही कल बदलल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षातील बंडाळीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे गटाकडून सर्वात आधी पक्षाचं गटनेते पद, त्यानंतर पक्षप्रमुख पद आणि त्यापाठोपाठ थेट पक्ष आणि पक्षचिन्हावरच दावा करण्यात आला. सध्या दोन्ही गटांत पक्षचिन्हावरुन सुरु असलेली स्पर्धा राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणूक आयोगाकडून पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानंतर दोन्ही गटांना आपापले पर्याय सादर करण्यासाठी निवडणूक आयोगानं आज (सोमवारी) दुपारी 1 वाजेपर्यंतची मुदत दिली होती. त्यानुसार, दोन्ही गटांनी आपापले पर्याय आयोगासमोर मांडले आहेत. 


पक्षाच्या नावावरुन ठाकरे-शिंदेंमध्ये रस्सीखेच 


नवं चिन्हं आणि नावावरुन ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार संघर्ष सुरु झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षासाठी तीन नावं सुचवली होती. शिंदे गटही पक्षाच्या नावात बाळासाहेबांचा उपयोग करणार आहे. पण बाळासाहेबांच्या नावाचा वापर दोन्ही गटांनाही करता येणार नाही असं समजत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :