Eknath Shinde : आम्ही तीन महिन्यांपूर्वी जे महानाट्य केलं, त्याचे पडसाद आजही उमटत आहेत. आम्ही जगभरात फेमस झालो आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मुंबईमधील षण्मुखानंद हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रशांत दामले यांच्या नाटकाचे 12 हजार 500 प्रयोग पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी प्रशांत दामलेंसह सर्व कलाकारांचे आणि रसिक प्रेक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशांत दामले यांना "तुम्ही नेहमीच ताजेतवाने दिसता. इतकी ऊर्जा कुठून आणता असे विचारले. त्यावर प्रशांत दामले यांनी "माझी एनर्जी रसिक प्रेक्षकांकडून येते" असं सांगितले. तसेच, रंगमंचावरचा कलावंत जेव्हा आपली कलाकृती साकारतो, कलेचा अविष्कार जेव्हा घडवतो. तेव्हा समोर जे रसिक प्रेक्षक असतात त्यांनी दाद दिली तरंच त्यांची कला अधिक वृद्धिंगत होते आणि त्या कलावंताचं देखील मनोबल वाढतं. अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी कलाकारांचं आणि नाट्य रसिकांचं कौतुक केलं. "आमचंही असंच आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उशिरापर्यंत काम करायचे. आजही आम्ही काम करतो. शिवसेना भाजप युतीचे सरकार कलावंतांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
ठाण्यात चित्रनगरी उभारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाण्यात चित्रनगरी उभारणार असल्याची घोषणा केली. मुंबई आणि ठाण्याच्यामध्ये एक चित्रनगरी उभारणार आहोत. त्यामुळे कलाकारांना मोठं व्यासपीठ उपलब्ध होईल. कलेला वाव देण्यासाठी कलाकारांच्या पाठिशी आहोत असं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
नाट्यगृहांची दुरावस्था सुधारणार
यावेळी प्रशांत दामले यांनी महाराष्ट्रातील 51 नाट्यगृहांची दुरूस्थी करावी अशी अशी विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ज्या नाट्यगृहांची दुरुस्ती डागडुजी आहे ती करू. तातडीने एक नोडल ऑफिसर नेमून या सगळ्या नाट्यगृहांची पाहणी केली जाईल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
महत्वाच्या बातम्या :