CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अयोध्येत (Ayodhya) दाखल झाले आहेत. मोठ्या जल्लोषात अयोध्येत त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अयोध्येत रॅली सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंबोबस्त तैनात करण्यात आला आहे.


राम जन्मभूमित उत्साह 


सर्वांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वत्र भगवं वातावरण झालं असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. सर्वजण अतिशय खुश आणि आनंदी असल्याचे ते म्हणाले. आमचं जंगी स्वाग केल्याबद्दल अयोध्येतील जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. सर्वच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राम जन्मभूमित उत्साह असतोच असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा उत्साह एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्ववादी सरकार राज्यात आल्याचा उत्साह असल्याचे फडणवीस म्हणाले.


महाराष्ट्र देशातील एक नंबरचे राज्य व्हावं, प्रभु रामाच्या चरणी प्रार्थना : देसाई


आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर प्रभु रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचेही अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वप्न होतं. यासाटी बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवल्याचे देसाई म्हणाले. सध्या राम जन्मभूमीत मोठ्या उत्साहाचं वातावरण असल्याचे देसाई म्हणाले. आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंना आत्मिक समाधान लाभत असेल असे देसाई म्हणाले. आम्ही एकनाथ शिंदे यांना आग्रह केली की, आता आपण अयोध्येला जाऊ या असे देसाई म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे राज्य व्हावं, देशात सगळ्यात सुजलाम सुफलाम् राज्य असावं, कोणतंही संकट येऊ नये अशी प्रभू रामाच्या चरणी मागणी असल्याचे देसाई म्हणाले. 


आज रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती होणार


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज अयोध्या दौऱ्यावर  आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीवर महाआरती देखील करणार आहेत. शनिवारी सायंकाळपासून सुरू मुख्यमंत्री शिंदे यांचा दोन दिवसीय अयोध्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. हा अयोध्या दौरा भव्यदिव्य करण्यासाठी भाजप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी अयोध्या दैरा होत असल्यानं याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुमारे 9 तास प्रभू रामाच्या नगरीत घालवतील. प्रभू रामासाठी उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिराचा आढावा ते घेणार आहेत. शिंदे मंदिराचं बांधकाम पाहतील.


महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटन, अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊतांचा सरकारवर निशाणा