दोन दिवसांपूर्वी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरुप बचावले. सुदैवानं मोठा अनर्थ होता-होता टळला. या अपघातानंतर राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांना काय वाटतं हेच आम्ही जाणून घेतलं.
प्रश्न : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहीती तुम्हाला सर्वात आधी कोणाकडून मिळाली, आणि त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती?
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती, त्यांनीच स्वत: दिली. यानंतर त्यांनीच स्वत: आपण सर्व सुखरुप असल्याबद्दलही सांगितलं. पण फक्त तुम्ही कुणी टीव्ही पाहू नका, अशी सूचना केली. कारण त्यासंबंधी बातम्या रंजकतेतनं दाखवल्या जातील अशं त्यांचं म्हणणं होतं. पण यावर मी त्याला विचारलं की ते ठिक आहे. तुम्ही खरंच ठिक आहात ना? त्यावर त्यांनीच सांगितलं की, हो मी ठिक आहे. आम्हाला कसलीही इजा झाली नाही. मी 4 ते 4.30 पर्यंत येतो. त्यानंतर तू स्वत: पाहा.
प्रश्न : या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची भीती वाटते का?
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : मुळीच नाही..! कारण दौरे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याची भीती अजिबात वाटत नाही. अन् ज्या माणसाला दिवसाचे 24 तास पूरत नाहीत. त्याला अशा दौऱ्यांसाठी रस्ते मार्गे प्रवास करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना अशी अडवणूक करता येणार नाही. पण मी एक सांगते 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्याचाच सदैव विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही. याची अम्हाला सदैन खात्री आहे.
प्रश्न : पण या घटनेनंतर तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का?
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : नाही.. मुख्यमंत्र्यांना मी असा काही सल्ला दिला नाही. पण एक आई म्हणून माझ्या समाधाना करता त्यांना काही गोष्टी सांगत असते, आणि तेही त्यावर सकारात्मक उत्तरं देतात.
प्रश्न : मुख्यमंत्री निलंग्यावरुन घरी परत आल्यावर त्यांनी काय सांगितलं?
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : ते म्हणाले की, बघं मी सुखरुप परत आलो आहे. पण त्यावर मी विचारलं इतर सर्वही सुखरुप आहेत का त्यावर ते ही म्हणाले की, हो.. इतरही सर्व सुखरुप आहेत केवळ, केतन पाठक यांना थोडसं लागलं आहे. बाकी अम्हाला काही कुणाला लागलं नाही. आम्ही सगळी ठिक आहोत.
प्रश्न : गडचिरोली मध्येही असाच प्रकार घडला होता त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया होती?
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हो.. तेव्हाचं मला काही नीटसं समजलं नव्हतं. पण त्यानंतर त्यांनी अनेक दौरे केले. पण त्यादरम्यान काही भीती वाटली नाही. किंवा त्रासही झाला नाही. पण एकाच गोष्टीची खंत वाटते की, जो व्यक्ती लोकांसाठी एवढा झिजतो आहे, स्वत: च्या जीवाला त्रास करुन घेत आहे. 45 अंश सेल्सिअस तापमानात स्वत: फिरतो आहे, पण इतकं चांगलं काम करत असताना ही आपल्या मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, हे पाहून मला त्रास होतो.
मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींची विस्तृत मुलाखत पाहा