सांगली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगली दौरा पुढे ढकलला आहे. वाळवा तालुक्यातील आष्टा येथील अतिरिक्त तहसिल कार्यालयाच्या उद्‌घाटन कार्यक्रमासाठी आणि सांगली महानगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी शुक्रवारी मुख्यमंत्री सांगली जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र या दौऱ्यावर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे सावट असल्याने हा दौरा पुढे ढकलन्यात आला आहे.


आता 30 जुलै रोजी मुख्यमंत्री सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी 2 सभा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कोणत्याही मंत्र्याला वाळवा तालुक्‍यात पाय ठेवू द्यायचा नाही, असा ठराव मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर हा दौरा पुढे ढकलण्यात आला.

आष्टयात बऱ्याच वर्षाच्या मागणीनंतर अतिरिक्‍त तहसिल कार्यालय करण्यात आले आहे. याबद्दल मुख्यमंत्र्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आष्टा शहरात करण्यात आले होते. याशिवाय सांगली महापालिकेच्या प्रचारासाठी सांगली आणि मिरजेत मुखमंत्र्याच्या सभा होणार होत्या.

मुखमंत्र्याच्या या सभेमुळे महापालिकेचे प्रचाराचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता होती. त्यामुळे मुखमंत्र्याच्या या दौऱ्याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. मात्र पेटलेला मराठा आरक्षणाचा मुदा आणि मराठा समाजाने या दौऱ्याला विरोधाची घेतलेली भूमिका यामुळे हा मुख्यमंत्री यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.



संबंधित बातम्या 

मराठा क्रांती मोर्चाकडून आजही अनेक जिल्ह्यात बंद