अहमदनगर: ‘मतदारांना दारु पाजून निवडणूक जिंकणं ही राजकीय हत्याच आहे. पोलिसांना हप्ते देऊन अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा हाच पारदर्शक कारभार आहे का?  अवैध धंदे बंद होत नसतील तर गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा.’ अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.


पांगरमलच्या दारु कांडातील बळीच्या कुटुंबीयांच्या सांत्वनानंतर त्या बोलत होत्या. यावेळी तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पोलिसांवर टीकास्त्र सोडलं. ‘पोलिसांना हप्ते मिळत असल्यानं आणि राजकीय नेत्यांच्या स्वार्थानं दारुकांड घडलं. या दारुकांडातील मृतांच्या नातेवाईकांना शिवसेनेनं दत्तक घ्यावं.’ अशी मागणी देसाईंनी केली आहे.

‘अवैध धंदे पोलिसांच्या आशीर्वादानं सुरु असून मुख्यमंत्री पारदर्शक कारभार असल्याचं सांगतात. मात्र, गृहमंत्र्यांनी राज्यातील सर्व अवैध धंदे बंद करावेत, नाहीतर गृहमंत्रीपद सोडावं.’ अशीही मागणी त्यांनी केली.

राजकीय फायद्यासाठी अवैध धंद्यातून हत्या होणार असतील तर अच्छे दिन कोणासाठी आले आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

निवडणूकी पूर्वी दारु बंद करण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली आहे. तसेच मार्च महिन्यात दारु मुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची सुरुवात नगरमधून करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.

संबंधित बातम्या:





गावठी दारुचे अड्डे नष्ट करण्यासाठी 'ड्रोन'चा वापर

'ड्राय डे' जाचक आणि बेकायदेशीर, हॉटेल संघटनांची याचिका

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातच बनावट दारुचा अड्डा