मुंबई : शिवसेना आणि भाजपाने सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्याचं दिसत आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राज्यपालांची भेट घेतली.


महायुतीतीत प्रमुख पक्षांच्या दोन्ही नेत्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचं सांगितलं आहे. मात्र या भेटींतून दोन्ही पक्षांनी एकप्रकारे सत्तास्थापनेचे संकेत दिले आहेत. महापौर झाल्यापासून दिवाळीनिमित्त आपण प्रत्येक वर्षी राज्यपालांना भेटण्याची परंपरा आहे. त्यानुसार आजही दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्यपालांची भेट घेतल्याचं दिवाकर रावतेंनी म्हटलं.





लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना, भाजपामध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. मात्र भाजपचा याला विरोध आहे.


विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप 105 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर शिवसेना 56 जागा जिंकत दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजपला शिवसेनेने सोबत युती अनिवार्य आहे. त्यामुळेच शिवसेना आक्रमक पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तेचं समान वाटप व्हावं, यावर शिवसेना ठाम आहे.


शिवसेनेनं भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी करत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री या फॉर्म्युल्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेच्या मागण्या मान्य करणार का? दोन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार की शिवसेना बोलतेय त्याप्रमाणे इतर पर्याय अमलात आणणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.



 संबंधित बातम्या